शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सुनील तटकरे राष्ट्रवादी नव्हे कुटुंबवादी, भास्कर जाधव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 17:49 IST

कुणबी समाजाला विधान परिषद द्या हे बोललो तर सुनील तटकरेंना मिरच्या का झोंबल्या?. अंगावर आलात तर भास्कर जाधव शांत बसणार नाही, असेही त्यांनी सुनावले आहे.

चिपळूण : कुणबी समाजाला विधान परिषद द्या हे बोललो तर सुनील तटकरेंना मिरच्या का झोंबल्या? राष्ट्रवादीचे नाव घेऊन नेहमी कुटुंबवादी राजकारण करून सर्व पदे स्वतःच्या घरात ठेवायची आणि दुसऱ्याच्या राजकीय जीवनाची माती करायची हेच सुनील तटकरे यांचे धोरण राहिले आहे. बोगस कंपन्या काढून हजारो कोटी रुपये लुबाडायचे, गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमीन हडपायची, अशा नीतीमत्ता गमावलेल्या व उपकारांची जाण नसलेल्या सुनील तटकरे यांना मी मार्गदर्शन करूच शकत नाही, अशा शब्दात आमदार भास्कर जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. अंगावर आलात तर भास्कर जाधव शांत बसणार नाही, असेही त्यांनी सुनावले आहे.कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची जागा कुणबी समाजाला देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी आमदार जाधव यांनी खेड तालुक्यातील पंधरागाव आंबडस येथील शिवसेना मेळाव्यानिमित्ताने केली होती. त्यांच्या या मागणीवर खासदार सुनील तटकरे यांनी उत्तर देताना जाधवांनी कुणबी समाजाचा अपमान केला आहे. तसेच शिवसेना-राष्ट्रवादी आणि पुन्हा शिवसेना अशी राजकीय वारी करणाऱ्या आमदार जाधवांचे आपण मार्गदर्शन घेऊ, असे अनेक उपरोधिक टोले लगावले होते. त्यामुळे संतापलेल्या जाधवांनी पत्रकार परिषद घेत सुनील तटकरे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.भास्कर जाधवांनी केलेल्या या टीकेला आता सुनिल तटकरे काय उत्तर देतात हे पहावे लागणार आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असतानाही स्थानिक पातळीवर नेत्यांचे वेळोवेळी खटके उडत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे विरोधी भाजपच्या नेत्यांकडून हे सरकार कोसळणार असल्याची भाकिते केली जात आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBhaskar Jadhavभास्कर जाधवsunil tatkareसुनील तटकरे