शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सुनील तटकरेंनी घेतली शरद पवार गटाचे नेते रमेश कदमांची भेट

By संदीप बांद्रे | Updated: April 2, 2024 19:25 IST

चिपळूण : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अजित पवार गट आणि मित्र पक्षाचे रायगड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुनिल ...

चिपळूण : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अजित पवार गट आणि मित्र पक्षाचे रायगड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुनिल तटकरे हे खेड तालुक्यातील लोटे येथे एका बैठकीच्या निमित्ताने मंगळवारी आले होते. यावेळी त्यांना शरद पवार गटाचे नेते, चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया झाल्याचे कळतात सुनिल तटकरे यांनी आपला दौरा तातडीने आटोपून त्यांच्या जयेश निवासस्थानी सायंकाळी ६ वाजता जाऊन तब्बेतीची चौकशी केली.खासदार सुनिल तटकरे आणि रमेश कदम यांची मैत्री सुपरिचित आहे. सुनिल तटकरे यांना कदम यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया झाल्याचे समजले. तातडीने त्यांनी खेडनंतर असलेला पूर्वनियोजित दौरा रद्द करून तातडीने चिपळूणला धाव घेतली. जयेश निवासस्थानी ते दाखल झाले. रमेश कदम यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या दोन नेत्यांमध्ये केवळ दहा मिनिटं भेट झाली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे आदी मोजकीच मंडळी उपस्थित होते. शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन गटातील नेत्यांमध्ये नेमकी राजकीय चर्चा या वेळी काय झाली, याचा फारसा तपशील समजू शकला नाही, परंतु मी ज्या पक्षात असतो, तेथे प्रामाणिकपणे काम करतो, असे रमेश कदम यांनी खासदार सुनिल तटकरे यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत दोन नेत्यांमधील हे भेट सायंकाळी चर्चेचा विषय ठरली होती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsunil tatkareसुनील तटकरेRamesh Kadamरमेश कदम