विज्ञान शिक्षक मंडळाच्या निबंध स्पर्धेचे रविवारी बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:32 IST2021-09-03T04:32:07+5:302021-09-03T04:32:07+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाने २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. ...

विज्ञान शिक्षक मंडळाच्या निबंध स्पर्धेचे रविवारी बक्षीस वितरण
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाने २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी होणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता बक्षीस वितरण लांबणीवर टाकण्यात आले होते. मात्र, आता कोरोनासंदर्भात सर्व नियम मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स पाळून रविवार, ५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता रवींद्र इनामदार, ४९० दुर्वांकूर,स्वामी स्वरुपानंद वसाहत, गयाळवाडी, खेडशी (ता. जि. रत्नागिरी) येथील विज्ञान मंडळाच्या कार्यालयात बक्षीस वितरण होणार आहे.
विजेत्या स्पर्धकांमध्ये गट अ ८वी ते १०वीमध्ये मधुमती सुनील मयेकर, श्रावणी संदेश पारकर, आराध्य नंदकुमार पाटील, सानिया यशवंत जाधव, निषाद नितीन बांदकर, मनीष महेश कोकरे, सोहम सुधाकर गावडे, श्रावणी संदीप उत्तेकर यांनी यश मिळविले आहे. गट ब मध्ये रामचंद्र आनंदा चव्हाण - पाटील, दामिनी दत्ताराम आपणकर, सुनीता प्रल्हाद सोमण, कल्पेश आत्माराम पारधी, अविनाश अनंत काळे, सीमा गजानन सागवेकर, प्रमिला हरिदासराव पाटील यांनी यश मिळवले.
विजेत्या स्पर्धकांनी रविवार, दि. ५ सप्टेंबर २०२१ रोजी मंडळाच्या कार्यालयात बक्षीस घेण्यासाठी सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, उपाध्यक्ष राजू जानकर, कार्यवाह प्रभाकर सनगरे, सहकार्यवाह मनोज घाग, कोषाध्यक्ष मोहन पाटील, विज्ञान समन्वयक दामिनी भिंगार्डे, मीना कोळपे, मोहन ढेरे, संजय बनसोडे, श्रीधर जोशी, गोविंद सुरवसे, एच. व्ही. सुतार, वीणा कुलकर्णी, जे. व्ही. पाटील, संजय मुळ्ये, बाजीराव शेटोळे, उर्दू माध्यमप्रमुख इम्तियाज सिध्दकी यांनी केले आहे.