कोठडीत आत्महत्या; दोन पोलीस निलंबित
By Admin | Updated: September 2, 2014 23:32 IST2014-09-02T23:32:11+5:302014-09-02T23:32:11+5:30
पत्नीची हत्या केल्यानंतर अटक

कोठडीत आत्महत्या; दोन पोलीस निलंबित
रत्नागिरी : पत्नीची हत्या केल्यानंतर अटक झालेला आरोपी अंकुश महादेव वेलोंडे (वय ३८, रा. ओरी, रत्नागिरी) याने पोलीस कोठडीतच केलेल्या आत्महत्येप्रकरणी त्यावेळी ड्यूटीवरील दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत. याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे.
अंकुश वेलोंडे याला पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात २९ आॅगस्ट रोजी अटक केली होती. त्याच्या विरोधात भारतीय दंडविधान ३०२, ३२३, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ३० सप्टेंबर रोजी शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत सकाळी कोठडी सुरक्षा कर्मचाऱ्यांना सांगून तो नैसर्गिक विधीसाठी गेला तेथेच गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी सुरक्षेवर असलेले हवालदार प्रदीप बाळकृष्ण लाड व पोलीस नाईक सचिन विजय भरणकर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)