शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत व्यावसायिकाची आत्महत्या, कारण गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 19:40 IST

Suicide Ratnagiri- रत्नागिरीतील बांधकाम व्यावसायिक चंद्रकांत शांतीलाल पटेल यांनी गुरुवारी पहाटे इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पहाटे ५.३० वाजता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलेने त्यांचा मृतदेह पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. त्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देमॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलेने पाहिला मृतदेह आत्महत्येच्या घटनेनंतर एकच खळबळ

रत्नागिरी : रत्नागिरीतील बांधकाम व्यावसायिक चंद्रकांत शांतीलाल पटेल यांनी गुरुवारी पहाटे इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पहाटे ५.३० वाजता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलेने त्यांचा मृतदेह पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. त्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली.शहरातील माळनाका येथील तारा ऑर्किड येथे चंद्रकांत पटेल वास्तव्याला होते. दोन महिन्यांपूर्वी लॉकडॉऊन उठल्यानंतर ते आपल्या मूळ गावाला गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर त्यांनी यशस्वी मातही केली होती. दोन महिने ते घरीच होते. एक दिवसापूर्वी ते आपल्या वडिलांसह रत्नागिरीत परतले होते. गुरुवारी पहाटेच्या सुमाराला त्यांनी आपल्या फ्लॅटला बाहेरून कडी लावली आणि इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.सकाळी साडेपाच वाजता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलेला त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.पटेल यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांची आर्थिक परिस्थितीही चांगली होती. २ ते ३ इमारती त्यांनी स्वतः उभ्या केल्या असून, रत्नागिरीत त्यांचे स्वतःच्या मालकीचे ३ ते ४ फ्लॅट आहेत. असे असताना गावातून परतल्यानंतर अचानक त्यांनी आत्महत्या का केली हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस