शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

आंबवणे येथील चोराची पेटवून घेवून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 16:43 IST

मंडणगड तालुक्यातील आंबवणे बुद्रुक येथे मागील महिन्याभरापासून सुरू असलेल्या चोरीच्या प्रकरणातील संशयित तरूणाने बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देआंबवणे येथील चोराची पेटवून घेवून आत्महत्यापकडले जाण्याच्या भीतीने पेटवून घेतले

मंडणगड : तालुक्यातील आंबवणे बुद्रुक येथे मागील महिन्याभरापासून सुरू असलेल्या चोरीच्या प्रकरणातील संशयित तरूणाने बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली.यासंदर्भात मंडणगड पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, जयेश सुभाष रहाटवळ (आंबवणे बुद्रूक) हा गेल्या महिन्याभरापासून वंदना प्रल्हाद गव्हाळे यांच्या घरात रात्री शिरून खाण्याचे पदार्थ व वस्तूंची चोरी करत होता.

त्यामुळे अज्ञात चोराची माहिती मिळवण्यासाठी गव्हाळे यांनी आपल्या घराच्या माळ्यावर सीसीटिव्ही कॅमेरा बसवला होता. या कॅमेरामध्ये जयेश हा घरात रात्रीचा शिरून चोरी करताना दिसला होता. त्यामुळे गावात सुरू असलेल्या चोरीसंदर्भात जयेश याचे नाव पुढे आले होते.जयेश याला पकडण्यासाठी ग्रामस्थ व पोलीसांनी अनेक शोधमोहीमा राबवल्या होत्या. मात्र त्यामध्ये तो सापडून आला नव्हता. बुधवारी रात्री ८ ते ८.३० वाजण्याच्या दरम्यान गव्हाळे यांच्या घरात खिडकीतून चोरी करण्याच्या उद्देशाने जयेश याने प्रवेश केला.

याची कुणकुण ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी त्याला पकडण्यासाठी घराला घेराव घातला. यावेळी आपण फसलो गेलो आहोत. आता आपण पकडले जाणार, असे समजताच त्याने घरात असलेले रॉकेल स्वत:च्या अंगावर ओतून घेत पेटवून घेतले.पेटत्या अवस्थेत त्याने घराच्या माळ्यावरून अंगणातील मांडवावर उडी मारली. यावेळी मांडवावर गवत असल्याने गवतानेही पेट घेतला. त्यामुळे जयेश याला वाचवण्यात ग्रामस्थांना अपयश आले.

भाजून गंभीर जखमी झाल्याने जयेश याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याबाबत मंडणगड पोलीस स्थानकात भारतीय दंड विधान कलम ४५७, ३८०, ५११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfireआगRatnagiriरत्नागिरी