शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरातील जैतापूर खाडीत अचानक वाळूचा उंचवटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 11:56 IST

राजापूर तालुक्यातील जैतापूर खाडीच्या मुखाशी माडबन व मिठगवाणे हद्दीत सुमारे ४ फुट उंच व ५०० मीटर लांबीचा वाळूचा सॅण्डबार (उंचवटा) नैसर्गिकरित्या तयार झाला आहे. या उंचवट्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची झोप उडाली आहे. उंचवट्यामुळे भरतीचे पाणी खाडीत येणे बंद झाले असून, त्यामुळे परिसरातील विहिरींचे पाणीही तळाला गेले आहे.

ठळक मुद्देराजापुरातील जैतापूर खाडीत अचानक वाळूचा उंचवटाग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, विहिरींचे पाणी तळाला

राजापूर : तालुक्यातील जैतापूर खाडीच्या मुखाशी माडबन व मिठगवाणे हद्दीत सुमारे ४ फुट उंच व ५०० मीटर लांबीचा वाळूचा सॅण्डबार (उंचवटा) नैसर्गिकरित्या तयार झाला आहे. या उंचवट्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची झोप उडाली आहे. उंचवट्यामुळे भरतीचे पाणी खाडीत येणे बंद झाले असून, त्यामुळे परिसरातील विहिरींचे पाणीही तळाला गेले आहे.जैतापूर खाडीच्या मुखापासून काही अंतरावर माडबन व मिठगवाणेच्या हद्दीत सुमारे चार फुट उंच व पाचशे मीटर लांब वाळूचा उंचवटा तयार झाला आहे. हा उंचवटा नैसर्गिकरित्या तयार झाल्याचे जैतापूरचे बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी सांगितले.पंधरा दिवसांपूर्वी हा उंचवटा तयार झाला असावा, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अचानक वाळूचा उंचवटा तयार झाल्यामुळे खाडीपट्ट्यातील जनतेसाठी समस्या निर्माण झाल्या आहेत. यापूर्वी भरतीच्यावेळी खाडीचे पाणी माडबन व मिठगवाणे गावात भरायचे. मात्र, वाळूचा ढिगारा तयार झाल्याने आता या गावात भरतीचे भरणारे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे या गावातील विहिरींची पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. काही विहिरींनी तर तळ गाठला आहे. विहिरींतील पाणी पुन्हा खाडीवाटे समुद्रात जाण्यासाठी मार्ग नसल्याने आजुबाजूच्या घरांना धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.या प्रकाराची माहिती मिळताच आमदार राजन साळवी यांनी गुरुवारी सायंकाळी माडबन, मिठगवाणे येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी बंदर विभागाचे अधिकारीदेखील उपस्थित होते. खाडीच्या मुखावर तयार झालेला वाळूचा उंचवटा जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करु, असे आमदार साळवी यांनी या भेटीत ग्रामस्थांना सांगितले.

टॅग्स :WaterपाणीRajapur Nagar Parishadराजापूर नगर परिषदRatnagiriरत्नागिरी