शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींनी काँग्रेसवर केलेली टीका शरद पवारांना खटकली, दिल्लीत जाऊन भेटणार; म्हणाले, "अशी भाषा.."

By संदीप बांद्रे | Updated: September 23, 2024 18:04 IST

चिपळूण : संपूर्ण जगात काँग्रेसने भारत देशाचा स्वाभिमान दाखवून दिला होता. त्या काँग्रेसला तुम्ही नक्षलवादी पक्ष म्हणता, देशाच्या पंतप्रधानांना ...

चिपळूण : संपूर्ण जगात काँग्रेसने भारत देशाचा स्वाभिमान दाखवून दिला होता. त्या काँग्रेसला तुम्ही नक्षलवादी पक्ष म्हणता, देशाच्या पंतप्रधानांना अशी भाषा शोभत नाही. मी या संदर्भात दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटणार आहे, अशा शब्दांत खासदार शरद पवार यांनी येथे खडेबोल सुनावले. चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील स्वा. सावरकर मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत पंतप्रधानांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. ते पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान काँग्रेस पक्षाला नक्षलवाद्यांचा पक्ष, गुंडांचा पक्ष, भ्रष्टाचाराची पक्ष अशा शब्दांत हिणवले. पण देशाच्या पंतप्रधानांना अशी भाषा शोभत नाही. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये काँग्रेसचे सर्वाधिक योगदान राहिले, इंदिरा गांधी, राजीव गांधीनी या देशासाठी बिलिदान दिले. सोनिया गांधीच्या विरोधात आम्ही काही भूमिका घेतली होती. परंतु त्यांनी देखील या देशाबरोबर राहण्याची ठाम भूमिका घेतली. त्यांची पुढची पिढी देखील आज देशासाठी काम करत आहे. इंदिराजींनी तर संपूर्ण जगात भारत देशाचा स्वाभिमान दाखवून दिला होता. त्या काँग्रेसला तुम्ही नक्षलवादी पक्ष म्हणता, मी या संदर्भात दिल्लीत जाऊन पंतप्रधानाना भेटणार आहे, अशा शब्दात समाचार घेतला. ..तेव्हा वेगळीच माहिती पुढे आलीयानंतर खासदार पवार हे राज्य सरकारवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विषयावरून जोरदार बरसले. या सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. अहो सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि सरकार सांगतेय वाऱ्यामुळे पडला. मी देशाचा संरक्षण मंत्री होतो. नौदल माझ्या अखत्यारीत ही होते. मी माहिती घेतली तेव्हा वेगळीच माहिती पुढे आली. ज्या राजाने रयतेचे राज्य उभे केले, शेतकऱ्यांचा पिकाच्या देटाला देखील हात लावू नका असे आदेश दिले. त्या राजाच्या पुतळ्यात देखील पैसे खायची हिम्मत या सरकारने दाखवली आणि वर म्हणे वाऱ्याने पुतळा पडला. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ८० वर्षे उभा आहे, हेही पुतळ्यात पैसे खाणाऱ्या महायुतीच्या भ्रष्ट सरकारने लक्षात ठेवायला हवे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस