घशाच्या कर्करोगावर यशस्वी उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST2021-04-25T04:31:04+5:302021-04-25T04:31:04+5:30
चिपळूण : घशाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या एका ५० वर्षीय महिलेवर ओन्कोलाइफ केअर कॅन्सर सेंटर चिपळूण येथील डॉ. गौरव जसवाल ...

घशाच्या कर्करोगावर यशस्वी उपचार
चिपळूण : घशाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या एका ५० वर्षीय महिलेवर ओन्कोलाइफ केअर कॅन्सर सेंटर चिपळूण येथील डॉ. गौरव जसवाल यांनी नुकतेच रेडिएशन थेरेपीद्वारे यशस्वी उपचार केले.
संबंधित महिलेला अन्न गिळताना वेदना होणे आणि आवाजात बदल झाल्याची तक्रार होती. तिने शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला होता. अखेर व्ही मँट या अत्याधुनिक रेडिएशन तंत्राचा वापर करून रेडिएशन व केमोथेरेपीद्वारे तिच्यावर उपचार केले. त्यानंतर तिची तपासणी केली असता वैद्यकीयदृष्ट्या ती लक्षणेमुक्त होती आणि आवाजातील गुणवत्तेतही सुधार दिसून आला.
ही महिला आता पूर्वीसारखी जीवनशैली जगत आहे. कर्करोग हा एक गंभीर रोग आहे. परंतु योग्य वेळी निदान केले आणि पुरेसे उपचार केल्यास तो बरा होऊ शकतो, असे डॉ. जसवाल यांनी सांगितले.