साडवली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे फार्मसी परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:32 IST2021-09-03T04:32:31+5:302021-09-03T04:32:31+5:30
देवरुख : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून जुलै-ऑगस्ट २०२१ या कालावधीत घेण्यात आलेल्या डिप्लोमा फार्मसीच्या परीक्षेचा निकाल लागला ...

साडवली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे फार्मसी परीक्षेत यश
देवरुख : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून जुलै-ऑगस्ट २०२१ या कालावधीत घेण्यात आलेल्या डिप्लोमा फार्मसीच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
या परीक्षेत द्वितीय वर्ष डिप्लोमा परीक्षेचा निकाल ९८.३६ टक्के लागला असून, ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत अलमीन मुकादम व ऐश्वर्या गोखले या विद्यार्थिनींनी ९० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. सानिया रामदुल या विद्यार्थिनीने ८७.३० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर निकिता यादव हिने ८६.१० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला आहे. या निकालाबद्दल संस्थेचे चेअरमन व माजी राज्यमंत्री रवींद्र माने व कार्याध्यक्षा नेहा माने यांनी सर्वांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या यशामध्ये प्राचार्य डॉ. बसवराज हतपक्की व डिप्लोमा विभाग प्रमुख सुजित नगरे यांचे सहकार्य लाभले.