शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पावस येथील नेपाळी भावांच्या खुनाचा छडा लावण्यात यश, तत्कालीक कारणातून खून, एकाला अटक

By अरुण आडिवरेकर | Updated: May 3, 2024 22:46 IST

या गुन्ह्याचा तपास रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर हे करत होते. या खूनप्रकरणातील आराेपीचा शाेध घेण्याची सूचना पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केली हाेती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने या घटनास्थळाची पाहणी केली हाेती.

रत्नागिरी : तालुक्यातील पावस परिसरातील गाेळप मुसलमानवाडी येथे दाेन नेपाळी भावांच्या खुनाचा छडा लावण्यात पाेलिसांना यश आले आहे. या दाेन भावांच्या खूनप्रकरणी पाेलिसांनी गाेळप येथे आंबा बागेत काम करणाऱ्या एक गुराख्याला शुक्रवारी अटक केली आहे. सरणकुमार उर्फ गोपाळ क्षतीराम विश्वकर्मा (५८, रा. टिकापुर, जि. कैलाली, नेपाळ) असे त्याचे नाव आहे. त्याने तत्कालीक कारणातून हा खून केल्याचे पाेलिस तपासात पुढे आले आहे.

खडकबहादुर बलराम थापा क्षेत्री (७२), भक्तबहादुर बलराम थापा क्षेत्री (६७, दाेघेही रा. लम्की चुहा, चौरीपुर, कैलाली, नेपाळ) या दाेघांचा २९ एप्रिल राेजी मध्यरात्री खून करण्यात आला हाेता. ३० एप्रिल राेजी सकाळी हा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी आंबा बागायतदार मालक मुसद्दिक मुराद मुकादम यांनी फिर्याद दिली हाेती. त्यानुसार पूर्णगड पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.

या गुन्ह्याचा तपास रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर हे करत होते. या खूनप्रकरणातील आराेपीचा शाेध घेण्याची सूचना पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केली हाेती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने या घटनास्थळाची पाहणी केली हाेती.हा खून माहितगार व्यक्तीने केल्याची खात्री झाल्यानंतर आजूबाजूच्या नेपाळी गुरख्यांची कसून चौकशी करण्यात आली. या चाैकशीत सरणकुमार ऊर्फ गोपाळ क्षतीराम विश्वकर्मा याने या दाेघांचा खून केल्याचे समाेर आले. त्याने तत्कालीक कारणावरुन जीवे ठार मारल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली.

उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर, सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव, पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, योगेश खोंडे, यांच्यासह पूर्णगड सागरी पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक धायरकर यांनी ही कामगिरी केली. तसेच सहायक पाेलिस फाैजदार पांडुरंग गोरे, पाेलिस हवालदार सुभाष भागणे, विनोद कदम, शांताराम झोरे, नितीन डोमणे, विजय आंबेकर, बाळू पालकर, सागर साळवी, अमित कदम, योगेश नार्वेकर, सत्यजित दरेकर, योगेश शेट्ये, दीपराज पाटील, गणेश सावंत, प्रवीण खांबे, पोलिस नाईक दत्तात्रय कांबळे, अतुल कांबळे यांचा या कारवाईत सहभाग हाेता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसNepalनेपाळ