शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आभाळाएवढे दु:ख तरी देशासाठी शहीद झाल्याचा अभिमान, मोरवणेतील ढगळे कुटुंबाने वाहून घेतले देशसेवेला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 14:24 IST

सुभेदार अजय ढगळे हे भारत-चीन सीमेवर रेकी करत असताना झालेल्या भूस्खलनात शहीद झाले

संदीप बांद्रेचिपळूण : तालुक्यातील मोरवणे ढगळेवाडी येथील ढगळे कुटुंब गेली कित्येक वर्षे भारतीय सैन्यात देशाची सेवा करत आहे. वडील, भाऊ, चुलते आणि पुतण्या सर्वांनी देशाची सेवा केली. आता तर तरुण अजय ढगळे देशासाठी शहीद झाले. घरातील कर्ता तरुण अचानक निघून गेल्याचे आभाळाएवढे दुःख असतानाही देशासाठी शहीद झाल्याचा अभिमान या कुटुंबाला आणि मोरवणे गावाला आहे. ढगळे कुटुंबाची ही देशसेवा इतिहासात सुवर्णाक्षरात नोंद करण्यासारखी ठरणार आहे.मोरवणे ढगळेवाडीचे सुपुत्र सुभेदार अजय शांताराम ढगळे हे भारत - चीन सीमेवर रस्ता करण्यासाठी रेकी करत असताना झालेल्या भूस्खलनात शहीद झाले. प्रत्यक्षात अजय ढगळे हे १९९० मध्ये भारतीय सैन्यदलात सामील झाले. चिपळूण येथील माजी सैनिक मुलांचे वसतिगृहात राहून त्यांनी युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर अकरावीपर्यंत डीबीजे महाविद्यालयात शिक्षण झाले. बॉम्बे इंजिनिअर ग्रुप, पुणे येथे शिपाई पदावर कार्यरत असताना त्यांनी सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले. १०८ इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कारगिल युद्धात टायगर हिल जिंकणाऱ्या तुकडीचा ते हिस्सा राहिले होते.शहीद अजय ढगळे यांचे वडील शांताराम ढगळे हेही भारतीय सैन्यदलातून निवृत्त झाले होते. दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाले. चुलते सीताराम ढगळे तसेच भाऊ भगवान ढगळे यांनी भारतीय सैन्यदलात सेवा बजावली आहे. सध्या पुतण्या भरत ढगळे देशसेवेत आहे. संपूर्ण ढगळे कुटुंबाने देशसेवेला वाहून घेतलेले आहे. त्यांच्या या देशसेवेचा अभिमान असल्याचे माेरवणेतील ग्रामस्थांनी सांगितले.

बढती मिळणार हाेतीऑपरेशन पराक्रम मोहीम तसेच सुदानमधील शांती सेनेचे प्रतिनिधित्व त्यांनी केले होते. भारतीय सैन्याच्या अत्यंत महत्त्वाच्या (CIJW) कोर्समध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले होते. लवकरच त्यांची मेजर या पदावर बढती होणार होती. भारतीय सैन्यात एक जिगरबाज अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. मुंबईत बोरिवली येथे आपल्या कुटुंबाबरोबर वास्तव्यास असलेले अजय ढगळे हे प्रशिक्षण काळ पूर्ण करून काही दिवसांपूर्वीच भारत - चीन सीमेवर रुजू झाले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी