शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

सुदैवाने बचावला! दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत केलेली स्टंटबाजी अंगाशी; दारुच्या नशेत घेतली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 20:17 IST

Stunt Case : दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळुणातील वाशिष्ठी नदी दुथडी भरून वाहत आहे.

ठळक मुद्देदोन दिवस पडणाऱ्या  मुसळधार पावसाने दुथडी भरुन वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीत त्याने दारुच्या नशेत उडी मारली.

संदीप बांद्रेचिपळूण : पूरसदृश स्थिती असलेल्या नदीत उडी मारण्याचा स्टंट त्याच्या अंगाशी आला. दोन दिवस पडणाऱ्या  मुसळधार पावसाने दुथडी भरुन वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीत त्याने दारुच्या नशेत उडी मारली. पण पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहामुळे त्याला किनारा गाठता आला नाही. बराचवेळ पोहून तो दमला आणि वाहून जाऊ लागला. मात्र त्याच्या सुदैवामुळे थोड्या अंतरावर जाऊन तो बचावला. त्याची स्टंट बाजी सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला. दारूच्या नशेत हा प्रकार घडल्याचे पुढे येत आहे.

दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळुणातील वाशिष्ठी नदी दुथडी भरून वाहत आहे. सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे वाशिष्ठी व शिवनदी दुथडी भरून वाहत होती. त्यातच सायंकाळी भरतीचे पाणी वाढल्याने जुना बाजारपुल पाण्याखाली गेला होता, तर नवीन वाशिष्ठी पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी होते. अशात एक तरुण जुन्या पुलाच्या रेलिंगवर चढला आणि हात उंचावून ओरडू लागला. त्यामुळे नवीन पुलावरून पुराचे पाणी पाहणा ऱ्या   अनेकांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले.

थोड्याचवेळात त्याने थेट नदीपात्रात उडी घेतली. उलट पोहून परत पुलापर्यंत जाण्याचा प्रयत्न त्याने केला. मात्र पाण्याचा जोर वाढला असल्याने त्याला वेळ लागत होता. तो तिथपर्यंत पोहोचलाही. परंतु तेथून त्याचा हात निसटला आणि तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागला. त्यामुळे नवीन पुलावर उपस्थित असलेल्यांमध्ये गोंधळ उडाला.

तेथून नजीकच असलेल्या नवीन पुलापर्यंत पाणी वाढले होते. त्यामुळे तो नवीन पुलाखाली गेल्यास पाण्याच्या प्रवाहात गुदमरून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे त्याला काहीजण किनाऱ्यावर येण्याचा इशारा करत होते. परंतु तोपर्यंत दमलेला हा तरुण नवीन पुलाखाली वाहून आला आणि काही क्षण गायब झाला. त्यामुळे अनेकजण घाबरले होते. अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. पण नवीन पुलापासून काही अंतरावर तो पुन्हा दिसला. पाण्याच्या प्रवाहासाेबत वाहत वाहतच तो लांब अंतरावर किनाऱ्याला लागून बचावला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेChiplunचिपळुणPoliceपोलिसriverनदी