वाटद कवठेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला अनोख्या पद्धतीने मातृदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST2021-05-11T04:33:52+5:302021-05-11T04:33:52+5:30

फोटो १० नाकाडे फोल्डरमध्ये सेव्ह आहे. लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : विविध राष्ट्रीय, शासकीय, सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. ...

Students of Watad Kavthewadi School celebrated Mother's Day in a unique way | वाटद कवठेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला अनोख्या पद्धतीने मातृदिन

वाटद कवठेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला अनोख्या पद्धतीने मातृदिन

फोटो १० नाकाडे फोल्डरमध्ये सेव्ह आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : विविध राष्ट्रीय, शासकीय, सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेत जन्मदात्या आईच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातृदिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

कोरोनामुळे शासकीय नियमांचे पालन करून विविध उपक्रम ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आले. विद्यार्थ्यांना आईच्या कार्याप्रती आदर आणि आईच्या कार्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आईला पत्र लिहून तिच्या कार्याचा गौरव शब्दबद्ध केला. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दांतून आईच्या प्रति भावना व्यक्त केल्या.

विद्यार्थ्यांनी आईचे औक्षण करून शुभाशीर्वाद घेतले. शाळा बंद असल्याने ऑनलाईन पद्धतीने मातृदिन कार्यक्रम साजरा करण्याचे आवाहन शाळेचे शिक्षक माधव अंकलगे, गोविंद डुमनर यांनी केले होते. मात्र, ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन व्यवस्था नाही, अशा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आईप्रती असणारे प्रेम आणि तिचे महत्त्व आपल्या पत्रातून व्यक्त केले.

सध्या शाळांना सुट्या असून, दोन्ही शिक्षक सध्या आपत्कालीन सेवेंतर्गत कार्यरत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून मातृदिनसारखा संस्कारक्षम उपक्रम पालकांच्या सहकार्याने राबविण्यात आला.

मातृदिन उपक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास बारगुडे, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ सखाराम तथा अप्पा धनावडे, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा वैशाली कुर्टे, शिक्षणतज्ज्ञ भाऊ धनावडे, सदस्य श्वेता धनावडे, रमेश तांबटकर, स्वाती धनावडे, निकिता कुर्टे यांच्यासह सर्वच पालकांचे सहकार्य लाभले.

Web Title: Students of Watad Kavthewadi School celebrated Mother's Day in a unique way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.