शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी घातले चक्क झाडांचेच बारसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 15:39 IST

तान्हुल्याचे बारसे करतात हे साऱ्यांनाच माहित आहे. किंबहुना पशुपक्ष्यांना एखादे नाव ठेवून त्यांचेही बारसे करतात. मात्र, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी चक्क झाडांचेच बारसे केले आहे. तालुक्यातील वाटद - कवठेवाडी शाळेत झाडांचे बारसे ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. दोन गटात स्पर्धा घेण्यात आली होती.

ठळक मुद्देवाटद - कवठेवाडी शाळेचा अभिनव उपक्रम स्पर्धेत विराज आलीम, आयुष धनावडे ठरले विजेते

रत्नागिरी : तान्हुल्याचे बारसे करतात हे साऱ्यांनाच माहित आहे. किंबहुना पशुपक्ष्यांना एखादे नाव ठेवून त्यांचेही बारसे करतात. मात्र, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी चक्क झाडांचेच बारसे केले आहे. तालुक्यातील वाटद - कवठेवाडी शाळेत झाडांचे बारसे ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. दोन गटात स्पर्धा घेण्यात आली होती.गतवर्षी जुलै महिन्यात शाळेने दिलेल्या झाडाचे रोप लावायचे, त्याला स्वत:चे अथवा स्वत:च्या आवडीचे नाव द्यायचे आणि वर्षभर त्या झाडांची काळजी घेत त्याला वाढवायचे, असे नियोजन विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन जुलै महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीचे अधिकारी व पदाधिकारी यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना नारळाच्या रोपांचे वितरण करण्यात आले होते.

वाटद ग्रामपंचायत आणि पालक निधीतून रोपांची खरेदी करण्यात आली होती. या रोपांची लागवड करणे आणि निगा राखण्यासंदर्भात योग्य त्या सूचना त्या- त्या वेळी शाळेच्या वतीने करण्यात आल्या होत्या. वर्षभर असणारी झाडांची वाढ, त्यासंबंधीच्या नोंदी आणि अंतिम भेटी वेळी तज्ज्ञ परीक्षकांनी केलेल्या नोंदी यांची एकत्रित सांगड घालून निकाल जाहीर करण्यात आले.उपक्रमात विद्यार्थ्यांना दिलेल्या एकूण ३५ झाडांपैकी एक वगळता ३४ झाडे सुस्थितीत आहेत. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या श्रमनुभवासाठी सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. स्पर्धेच्या पहिल्या गटात विराज शाम आलीम, साहील विलास तांबटकर, यश पंकेश धनावडे आणि दुसऱ्या गटात आयुष भरत धनावडे, सोहम शशिकांत कुर्टे, स्वप्नील भास्कर घवाळी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. 

टॅग्स :environmentपर्यावरणRatnagiriरत्नागिरी