सेक्रेड हार्ट काॅन्व्हेंट स्कूलतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:33 IST2021-08-23T04:33:14+5:302021-08-23T04:33:14+5:30
रत्नागिरी : शहरानजीकच्या उद्यमनगर येथील सेक्रेड हार्ट काॅन्व्हेट हायस्कूलतर्फे दहावी उत्तीर्ण तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ...

सेक्रेड हार्ट काॅन्व्हेंट स्कूलतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार
रत्नागिरी : शहरानजीकच्या उद्यमनगर येथील सेक्रेड हार्ट काॅन्व्हेट हायस्कूलतर्फे दहावी उत्तीर्ण तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोनामुळे शासकीय नियमावलीचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी दहावीतील रूजूल अजित पवार, सायली चंद्रकांत कुर्ले, भूमी मनोज गुंदेचा, तन्वी मकरंद फडके, श्रेयस प्रदीप शिंदे, दुर्वेश निरंजन गांगण या विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील श्रेयस साळवी, सर्वम् बोरकर, श्रेया सागर कदम, ऋजुला शैलेश हळबे, राशी जगदीश सोनावणे यांनी यश संपादन केल्याबद्दल त्यांनाही गाैरविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सिस्टर नाताळ, व्यवस्थापिका सिस्टर हेजल, सीबीएसई शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सुवर्णा उपस्थित हाेते. अजिमा मुल्ला यांनी आभार मानले.