विद्यार्थ्यांनी तयार केले ‘काेराेना एक संधी’ विषयावर हस्तलिखित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:18 IST2021-03-30T04:18:59+5:302021-03-30T04:18:59+5:30

दापोली : काेराेना काळात आलेले अनुभव, त्या संदर्भातील कथा, कवितांचे एकत्रिकीकरण करून दापाेली तालुक्यातील चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘काेराेना एक ...

The students created a handwriting on the topic of 'Kareena Ek Sandhi' | विद्यार्थ्यांनी तयार केले ‘काेराेना एक संधी’ विषयावर हस्तलिखित

विद्यार्थ्यांनी तयार केले ‘काेराेना एक संधी’ विषयावर हस्तलिखित

दापोली : काेराेना काळात आलेले अनुभव, त्या संदर्भातील कथा, कवितांचे एकत्रिकीकरण करून दापाेली तालुक्यातील चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘काेराेना एक संधी’ या विषयावर हस्तलिखित तयार केले आहे. शाळेचे शिक्षक बाबू घाडीगावकर यांच्या संकल्पनेतून हे हस्तलिखित तयार करण्यात आले आहे.

कोरोनाच्या वर्षभराच्या प्रादुर्भाव काळात सर्वात जास्त नुकसान शालेय विद्यार्थ्यांचे झाले आहे. गेल्या वर्षभरापासून शाळा नियमित सुरु होऊ शकलेल्या नाहीत. बऱ्याच शाळांमधून ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून अभ्यासाचे धडे दिले जात हाेते. तरीही जानेवारीपासून उच्च प्राथमिक शाळांचे वर्ग कोरोनासंबंधीचे सर्व शासकीय निर्देश पाळून मर्यादित वेळेत सुरु झाले आहेत. चंद्रनगर शाळेतील शिक्षक बाबू घाडीगांवकर यांच्या कल्पनेतून कोरोना- एक संधी याच विषयावर विद्यार्थी हस्तलिखित तयार करावे, असा विचार पुढे आला.

सहावीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी हाेऊन हस्तलिखित तयार केले आहे. या हस्तलिखितातील कथा, निबंध, कवितांचे लेखन विद्यार्थ्यांनीच केले आहे. सेजल कोळंबे या विद्यार्थिनीने हस्तलिखिताचे संपादन केले आहे. लक्ष्मी शर्मा, श्रावणी कोळंबे, वेदांत पवार, धीरज शिगवण, सेजल कोळंबे या विद्यार्थ्यांनी या हस्तलिखिताचे सुलेखन केले आहे. कोरोना हा विषय निवडून विद्यार्थ्यांनी निबंध, कविता, कथा, कल्पनाविष्कार, आत्मवृत्तात्मक व पत्रलेखन केले आहे. हस्तलिखिताची सजावट धीरज शिगवण या विद्यार्थ्याने केली आहे.

Web Title: The students created a handwriting on the topic of 'Kareena Ek Sandhi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.