शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

घराच्या गॅलरीतच अडकले विवाहबंधनात-- पाच जणांच्या उपस्थितीत विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 11:30 IST

या सोहळ्याबद्दल बोलताना भाऊ मोहिते यांनी हा उपक्रम महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी राबवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.  अत्यंत साधेपणाने व कमी व्यक्तींच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला असल्याने खर्चात बचत झाली आहे.

ठळक मुद्देविवाहाचे पैसे देणार सामाजिक कार्याला

दापोली : लग्न म्हटले की, वधू - वरांच्या घरात उत्साहाचे वातावरण असते. वऱ्हाड्यांची गर्दी असते तर हॉलही सजलेला असतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ना बॅण्डबाजा ना व-हाडी, तर चक्क घराच्या गॅलरीत लग्न लावून इमारतीतील वऱ्हाडींनी खिडकीतूनच पुष्पवृष्टी केल्याचे दापोली तालुक्यातील जालगाव येथे घडले.दापोली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष व दापोली नगर पंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष अनंत उर्फ भाऊ मोहिते यांच्या मुलाचा विवाह लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केवळ पाच लोकांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने पार पडला. भाऊ मोहिते यांचा मुलगा अनिरुद्ध व तालुक्यातील गिम्हवणे येथील सुनील विठ्ठल महाडिक यांची कन्या सेजल हे केवळ पाच लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स राखून बंधनात अडकले.या लग्न सोहळ्यासाठी बेंडबाजा, फटाके, लाऊड स्पीकर आदी गोष्टींचा  वापर टाळण्यात आला होता. कोणत्याही पाहुणे मंडळींना बोलावण्यात आले नव्हते. बौद्ध उपासक दिलीप जाधव यांनी हा विवाह सोहळा पार पाडल्यावर इमारतीतील विविध सदनिकांमध्ये राहात असणाºया कुटुंबातील व्यक्तिंनी आपापल्या खिडकीतून लांबूनच वधू-वरांवर पुष्पवृष्टी केली.या सोहळ्याबद्दल बोलताना भाऊ मोहिते यांनी हा उपक्रम महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी राबवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.  अत्यंत साधेपणाने व कमी व्यक्तींच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला असल्याने खर्चात बचत झाली आहे. त्यामुळे वाचलेले पैसे आपण सामाजिक कामाला देणार असल्याचे भाऊ मोहिते यांनी स्पष्ट केले. या लग्न सोहळ्याची सध्या दापोलीत चर्चा सुरू आहे.मास्कचाही वापरहा विवाह सोहळा दुपारी ४ वाजता पार पडला. विवाहाच्या आधी त्याच ठिकाणी साक्षगंध विधी देखील पार पडला. या सर्व विधींच्या वेळी वधू, वर, लग्न लावणारे बौद्ध उपासक, वधू व वराची आई या सर्वांनी चेहऱ्यावर कोरोनारोधक मास्क लावला होता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणmarriageलग्न