खेड (जि. रत्नागिरी) : शहरानजीक देवणे पूल परिसरातील नारिंगी नदी पात्रात गोवंशाचे अवयव आढळल्यानंतर हे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत मंगळवारी खेडमधील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून घटनेचा निषेध केला. त्याचबराेबर उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांना निवेदन देऊन याप्रकरणी कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.गोवंश हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी सकल हिंदू बांधवांकडून खेड बाजारपेठ बंदची हाक देण्यात आली होती. परंतु साेमवारी सायंकाळी खेड पोलिसांनी या घटनेशी निगडित असलेल्या तीन संशयितांना अटक केली आहे. त्यानंतर पाेलिसांनी हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून सहकार्याचे आवाहन केल्याने माेर्चा रद्द केला. मात्र, व्यापाऱ्यांनी खेड बाजारपेठ बंद ठेवून घटनेचा निषेध केला.
Ratnagiri: खेडमध्ये गोवंश हत्येच्या निषेधार्थ कडकडीत बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 13:19 IST