रत्नागिरी-कोल्हापूर सीमेवर कडक तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:30 IST2021-04-11T04:30:32+5:302021-04-11T04:30:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील मुर्शी चेक नाका लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सीमा अधिक कडक करण्यात आहे. ...

Strict check on Ratnagiri-Kolhapur border | रत्नागिरी-कोल्हापूर सीमेवर कडक तपासणी

रत्नागिरी-कोल्हापूर सीमेवर कडक तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील मुर्शी चेक नाका लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सीमा अधिक कडक करण्यात आहे. प्रत्येक वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे.

शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करीत प्रत्येक वाहन पोलिसांच्या निगराणीखालून जात आहे. यावेळी प्रत्येक गाडीची कागदपत्रे, परजिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींची माहिती घेण्यात येत आहे. त्याचबरोबर, परराज्यातून येणारी गाडीतील व्यक्तींची कोविड चाचणी किंवा कोविड लस घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे का, हेही पाहिले जात आहे. तोंडाला मास्क बंधनकारक असून, या सर्वांची कडक अंमलबजावणी केली जात आहे.

कोंडगाव सरपंच बापू शेट्ये, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्रीधर कबनूरकर, पोलीस पाटील मारुती शिंदे यांनी पोलिसांच्या कामाचे कौतुक केले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बाईंग, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय मारळकर, पोलीस कर्मचारी प्रशांत नागवेकर, किरण देसाई, महिला पोलीस नाईक अर्पिता दुधाणे, हेमलता गोतावडे, होमगार्डचे कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत.

Web Title: Strict check on Ratnagiri-Kolhapur border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.