रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर अनेक ठिकाणी पडझड करुन वादळ उत्तरेकडे सरकले. या वादळाने निसर्ग वादळाइतके नुकसान झाले नसले तरी घरे आणि झाडांचे खूप नुकसान झाले आहे. महसूल खात्याने तत्काळ पंचनामे करण्याचे काम हाती घेतले आहे.रविवारी दुपारी १ वाजल्यापासून सुरू झालेली पावसाची संततधार सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास थांबली. वादळी वाऱ्याने पहाटेला विश्रांती घेतली. सोमवारी दुपारी सूर्यदर्शनही झाले.चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाने जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील गावांमध्ये दाणादाण उडवली. झाडे तुटून वीज वाहिन्यांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला. रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथे रस्ता खचल्याने हा मार्ग बंद झाला आहे.निसर्ग चक्रीवादळ जमिनीवरुन गेल्यामुळे त्यात मोठी हानी झाली. जुने मजबूत वृक्षही उन्मळून पडले. त्यातुलनेत तौक्ते वादळाने हानी कमी झाली. हे चक्रीवादळ जमिनीवर न येता समुद्रातूनच पुढे सरकले.
रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वादळ शांत, पाऊस थांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 14:53 IST
Cyclone Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर अनेक ठिकाणी पडझड करुन वादळ उत्तरेकडे सरकले. या वादळाने निसर्ग वादळाइतके नुकसान झाले नसले तरी घरे आणि झाडांचे खूप नुकसान झाले आहे. महसूल खात्याने तत्काळ पंचनामे करण्याचे काम हाती घेतले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वादळ शांत, पाऊस थांबला
ठळक मुद्दे रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वादळ शांत, पाऊस थांबला अनेक ठिकाणी पडझड, तत्काळ पंचनामे करण्याचे काम हाती