अधिकाऱ्याच्या डोक्यात घातला दगड

By Admin | Updated: September 28, 2014 23:58 IST2014-09-28T23:58:11+5:302014-09-28T23:58:25+5:30

गंभीर जखमी : भगवती मंदिर परिसरातील घटना; चौघे पसार

The stone laid in the head of the officer | अधिकाऱ्याच्या डोक्यात घातला दगड

अधिकाऱ्याच्या डोक्यात घातला दगड

रत्नागिरी : रस्त्यात मारुती कार मुद्दामहून उभी केली या गैरसमजातून तहसीलदारस्तरीय अधिकारी संदेश सुभाष आयरे (वय ३२, जेल रोड, रत्नागिरी) यांना चौघांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर रस्त्यावरील दगड उचलून एकाने आयरे यांच्या डोक्यात घातला. या मारहाणीत आयरे हे गंभीर जखमी झाले आहेत.
हल्लेखोरांमध्ये एका महिलेचाही समावेश असून याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सायंकाळी ६च्या सुमारास भगवत मंदिराच्या पायथ्याशी ही घटना घडली.
आयरे व त्यांची पत्नी नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने भगवती देवीचे दर्शन घेतले. ते मारुती स्विफ्ट गाडी (एम एच. ११ एडब्ल्यू ५९७६) घेऊन निघाले होते. याचवेळी गाडीजवळ असलेल्या दुचाकीवरील पती-पत्नीचा गैरसमज झाला. या पती-पत्नींनी भांडण करीत आयरे यांना मारहाण केली. यावेळी मारहाण करणाऱ्या पती-पत्नीच्या ओळखीचे आणखी दोघे तिथे आले व या चौघांनी मिळून आयरे यांना पुन्हा मारहाण केली. त्यातील एकाने रस्त्यावरील मोठा दगड उचलून आयरे यांच्या डोक्यात मारला. या मारहाणीत आयरे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर चौघेही हल्लेखोर पसार झाले. मारहाण करणाऱ्यांच्या दुचाकीचा नंबर (एम.एच. ०८-यू-००७) असा आहे. जखमी झालेल्या संदेश आयरे यांच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयरे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद करण्यात आला.
 

Web Title: The stone laid in the head of the officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.