शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला?, बळीराजाच्या जीवाला अधिकच घोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 17:55 IST

rain, farmar, ratnagirinews ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात सातत्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ लागल्याने रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात अधूनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होणारा पावसाचा परतीचा प्रवास लांबला असून मुक्काम वाढू लागला आहे. हवामाना खात्याने पुन्हा २१ ऑक्टोबरपर्यंत कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा मुक्काम वाढला? पिकाचे काय, बळीराजाच्या जीवाला अधिकच घोर

रत्नागिरी : ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात सातत्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ लागल्याने रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात अधूनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होणारा पावसाचा परतीचा प्रवास लांबला असून मुक्काम वाढू लागला आहे. हवामाना खात्याने पुन्हा २१ ऑक्टोबरपर्यंत कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पावसाचा परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र, सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून सातत्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याचा पंधरवडा संपला तरी पावसाचा मुक्काम वाढू लागला आहे.गेल्या आठवड्यात १३ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह कोकणात चार दिवस मेघगर्जनेस, विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडत होता. या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली होती. त्याचबरोबर शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.

यावेळी सुरूवातीला चांगला पाऊस झाल्याने भातशेती वेळेवर तयार झाली होती. त्यामुळे काहींनी भाताची कापणी करून घरी आणून पेंढ्या रचून ठेवल्या तर काहींचे पीक शेतातच उभे होते. या पावसाने उभे शेत आडवे केले तर रचून ठेवलेल्या भाताच्या पेंढ्याही पूर्णपणे भिजवून पिकाचे नुकसान केले. या संकटामुळे शेतकऱ्यांचे होते नव्हते ते पावसाने ओरबाडून नेले.गेल्या दोन दिवसांपासून पाऊस थोडासा थांबला आहे. त्यामुळे बळीराजा आता कापलेले भात कसेबसे घरात घेण्याच्या घाईत असतानाच आता पुन्हा सोमवारपासून हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने २१ ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जनेस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे आता बळीराजाच्या जीवाला पुन्हा घोर लागून राहिला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसRatnagiriरत्नागिरी