मंडणगडात कोविड रुग्णालयाचा दर्जा केवळ कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST2021-05-12T04:32:16+5:302021-05-12T04:32:16+5:30

मंडणगड : रुग्णशय्येवरील मंडणगड तालुक्यातील आरोग्य व्यवस्था केवळ कागदावरील दर्जा बदलल्याने काेराेनाला सामोरे जाण्यास समर्थ नसल्याची गंभीर बाब पुढे ...

The status of Kovid Hospital in Mandangad is only on paper | मंडणगडात कोविड रुग्णालयाचा दर्जा केवळ कागदावर

मंडणगडात कोविड रुग्णालयाचा दर्जा केवळ कागदावर

मंडणगड : रुग्णशय्येवरील मंडणगड तालुक्यातील आरोग्य व्यवस्था केवळ कागदावरील दर्जा बदलल्याने काेराेनाला सामोरे जाण्यास समर्थ नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. एप्रिल महिन्यात भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालयात इतर अन्य आजारांवर उपचार बंद करून केवळ कोविड रुग्णालय असा दर्जा देऊन उपचार सुरू करण्यात आले. मात्र, हा दर्जा केवळ कागदावरच राहिला असून, रुग्णांचे आजार कमी करण्यापेक्षा, त्यांना मृत्यूच्या वाटेवर नेणारे ठरत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यातील ग्रामीण भागात गावोगावी कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे़. त्यामुळे स्थानिक पातळीवर उपचाराची सुरू करण्यात आलेली ही अर्धीमुर्धी सोय पूर्णत्वाकडे नेण्याची आवश्यकता आहे. मानवी फुफ्फुसात कोविडचे किती संक्रमण झाले आहे, यावर उपचार ठरत असले तरी, यासाठी आवश्यक सिटी स्कॅन मशीन येथे उपलब्ध नाही़. याशिवाय कोरोनामुळे श्वसनक्रियेवर सर्वाधिक आघात होत असल्याने आवश्यक असणारा एकही व्हेंटिलेटर रुग्णालयात उपलब्ध नाही. तसेच १० पल्स ऑक्सिमीटर, ५ थर्मल गन, १० बीटल साईन मॉनिटर, १० जम्बो रेग्युलेटरसहित सिलिंडर, ५ ग्लोकोमीटर, १० फेसशिल्ड, २ हॉस्पिटल फावलर्स बेड, सर्जिकल ग्लोज, एन ९५ मास्क, एनआरबीएम मास्क व सॅनिटायझेशन पंपाची अग्रक्रमाने आवश्यकता आहे़. याशिवाय सर्व उपचारांकरिता गरजेचे असलेले फिजिशियन रुग्णालयात पूर्ण वेळ उपलब्ध असण्याची आवश्यकता आहे.

तालुक्यात आवश्यक बाबींची पूर्तता न करता सुरू केलेले काेविड रुग्णालय निरुपयाेगी ठरत आहे़. तालुक्यात वृद्ध नागरिक व विविध आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याचे काही दिवसांपासून आढळत आहे़. यासाठी आवश्यक सीटी स्कॅनसाठी दापोली, महाड, माणगाव ही शहरे गाठावी लागतात. फुफ्फुसांवर कोरोनाचे संक्रमण झाल्याचे दिसून आल्यास चांगले उपचार हाेणे गरजेचे आहे़. मात्र, येथे आवश्यक साधनसामग्री नसल्याने होणारे उपचार तोकडे पडत आहेत. सध्या ग्रामीण रुग्णालयात १० ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात आले असले तरी, तालुक्याची एकंदरीत परिस्थिती पाहता, ही संख्या वाढविण्याची गरज आहे. तसेच अत्यावश्यक बनलेल्या व्हेंटिलेटर व सिटी स्कॅन चाचण्या तालुक्यातच उपलब्ध करणे अनिवार्य केले आहे. अशी सामग्री उपलब्ध नसल्याने काही प्रसंगी आजारी व्यक्तींच्या जिवावर बेतत आहे. ग्रामीण भागात कम्युनिटी स्प्रेड होत असल्याचे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णसंख्येवरून स्पष्ट होत आहे.

Web Title: The status of Kovid Hospital in Mandangad is only on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.