शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

मागसवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे राज्यव्यापी धरणे आंदोलन, 'या' आहेत मागण्या

By मेहरून नाकाडे | Updated: October 11, 2022 18:29 IST

महावितरण कंपनीचे प्रशासकीय परिपत्रक क्रमांक ५२२, महापारेषणचे -४६१ व महानिर्मिती-२९७ हे मागासवर्गीयांचे संविधानिक हक्क हिरावून घेणारे असल्याने ते त्वरीत रद्द करण्यात यावे.

रत्नागिरी : महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या तिन्ही कंपन्यांमधील महत्वपूर्ण धोरणात्मक प्रश्नांच्या सोडवणुकीसह मागसवर्गीय कामगार विरोधी धोरण बंद करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागसवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे आज, मंगळवारी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. महावितरणच्या येथील कोकण परिमंडळ कार्यालयासमोरही धरणे आंदोलन करण्यात आले होते.कोकण परिमंडळ कार्यालयासमोरील धरणे आंदोलनात मागासवर्गीय विद्युत कर्मचारी सहभागी झाले होते. संघटनेतर्फे प्रलंबित धोरणात्मक मागण्यांच्या पुर्ततेसाठी पाठपुरावा सुरू असून त्याचाच भाग म्हणून आंदोलने करण्यात येत आहेत. यापूर्वी प्रवेशव्दार सभाही घेण्यात आली होती.

वीज कायदा दुरूस्ती विधेयक २०२२ हे संविधानविरोधी, राज्याच्या हिताच्या विरोधात तसेच मागासवर्गियांच्या घटनात्मक हक्कांच्या विरोधात असल्यामुळे त्याला शासनातर्फे विरोध करण्यासाठी वीज कंपन्यांनी प्रस्ताव पाठवावा. नवी मुंबई व इतर तीन जिल्हे अदानी कंपनीला देण्यासाठी केंद्र सरकारने काढलेले अन्यायकारक नोटीफिकेशन त्वरीत रद्द करण्यासाठी महावितरणने राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा. महावितरण कंपनीचे प्रशासकीय परिपत्रक क्रमांक ५२२, महापारेषणचे -४६१ व महानिर्मिती-२९७ हे मागासवर्गीयांचे संविधानिक हक्क हिरावून घेणारे असल्याने ते त्वरीत रद्द करण्यात यावे, या मागणीकडे लक्ष वेधले आहे.तिन्ही कंपन्यांमधील सहाय्यक अभियंता ते उपकार्यकारी अभियंता या पदाच्या अन्याय दूर करावा. महावितरण कंपनीतील मृत कर्मचारी वारसांना कंत्राटी पध्दतीएेवजी त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार कायमस्वरूपी कंपनीच्या सेवेत अनुकंपा तत्वावर सामील करून घेण्याकरीता कालबध्द धोरण आखून तशी विनाविलंब अंमलबजावणी करावी. महावितरणमध्ये सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविताना विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक, लेखा सहाय्यक, कार्यालयीन सहाय्यक ही पदे कंत्राटी पध्दतीने न भरता स्थायी स्वरूपात भरण्यात यावीत, आदि मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी परिमंडळ सचिव संजय तांबे, मंडळ सचिव प्रकाश मोहिते, अनंत सावर्डेकर यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीmahavitaranमहावितरणagitationआंदोलन