शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 14:13 IST

दापोली तालुक्याला निसर्गाचे मोठे वरदान

दापोली : तालुक्याचा पर्यटनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास व्हावा याकरिता दापोलीतील बीच पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था, लाडघर यांच्यावतीने राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.

दापोली तालुक्याला निसर्गाचे मोठे वरदान लाभले आहे. एका बाजूला हिरवेगार डोंगर तर दुसऱ्या बाजूला निळाशार समुद्र याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक दापोलीकडे येतात. मुंबई व पुणे येथून येणाऱ्या पर्यटकांमुळे तालुक्याचा आर्थिक स्तर उंचावत आहे. पर्यटकांची संख्या व त्यांचे मुक्कामाचे दिवस वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासन पातळीवर अनेक मुद्द्यांच्या अनुषंगाने विकास होणे आवश्यक आहे.

यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. पां. वा. काणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही तीन भारतरत्ने तसेच लोकमान्य टिळक, साने गुरुजी, रॅग्लर परांजपे, सरखेल कान्होजी आंग्रे या सर्वांचे दापोली तालुक्यात एकत्रित स्मारक उभे राहणे गरजेचे आहे. तारापोरवाला मत्स्यालयाच्या धर्तीवर दापोली कोकण कृषी विद्यापीठात मत्स्यालय उभारणे आवश्यक आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहेदापोलीत जैवविविधता पार्कची गरज आहे. दापोली तालुक्यातील हर्णे येथील गोवा किल्ल्यावरून सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे उभारणे, तसेच शिवाजी महाराज व सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावर कायमस्वरूपी होलोग्रफिक अथवा लेझर शो करण्याची मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.

साधारण सत्तर वर्षांपूर्वी या भागात बोट वाहतूक सुरू होती. दापोली तालुक्यात येण्यासाठी पर्यटकांना येण्यासाठी रेल्वे सुविधा नाही. त्यामुळे समुद्रमार्गे वाहतूक हा अतिशय सक्षम पर्याय आहे. याकडे यात लक्ष वेधण्यात आले आहे. दापोलीत विमानतळ तसेच खेडपासून दापोलीपर्यंत टुरिस्ट टॉय ट्रेनवरही यात भर देण्यात आला आहे.

पर्यटनाला उद्योगाचा दर्जा, पर्यटनस्थळी कोस्टगार्डची शासकीय टीम, समुद्रकिनाऱ्यावरील गावांमध्ये गोड्या पाण्याची उपलब्धता, भूमिगत वीजवाहिन्या, पर्यटनाच्या ‘क’ वर्गातील गावांचा ‘ब’ वर्गात समावेश, मार्केटिंगसाठी निधी, सीआरझेडमधून सूट मिळावी, अशा मागण्याही या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

एकत्रित स्मारक व्हावे

महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. पां. वा. काणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही तीन भारतरत्ने तसेच लोकमान्य टिळक, साने गुरुजी, रॅग्लर परांजपे, सरखेल कान्होजी आंग्रे या सर्वांचे दापोली तालुक्यात एकत्रित स्मारक उभे राहणे गरजेचे आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdapoli-acदापोली