राज्य शासनाची अधिसूचना निघाली;
By Admin | Updated: July 4, 2014 00:17 IST2014-07-04T00:14:42+5:302014-07-04T00:17:58+5:30
अभियांत्रिकी कामगार : आता लक्ष अमलबजावणीकडे

राज्य शासनाची अधिसूचना निघाली;
शिरगाव : राज्यातील अभियांत्रिकी उद्योगात काम करणाऱ्या कामगारांसाठी शासनाने वर्गवारी व परिमंडलनिहाय प्रतिमहिना किमान वेतन जाहीर केले आहे. यापूर्वीच्या महागाई भत्त्याला (विशेष भत्ता) यापुढे राहणीमान भत्ता असे निर्देशित करण्यात येणार आहे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांच्याकडून निर्गमित अधिसूचनेनुसार हे किमान वेतन पुनर्निर्धारित करण्यात आले आहे.
३ मार्च २०१४च्या अधिसूचनेप्रमाणे किमान वेतन अधिक विशेष भत्ता मिळणे आवश्यक असले तरी भत्त्याबाबतची कोणतीच माहिती उपलब्ध होत नाही. कामगार विभागाची वेबसाईट नवी माहिती अपडेट करण्याकरिता बंद केली असावी, असे उत्तर कामगार आयुक्त कार्यालयातून देण्यात आले.
औद्योगिक क्षेत्रात शासनाने पुनर्निर्धारित केलेल्या दराबाबत अनेक कंपन्या अनभिज्ञ आहेत. शासनाने वेबसाईटवर परिपूर्ण माहिती तत्काळ द्यावी अन्यथा स्वतंत्र मालकांना सूचित करावे, अशी मागणी कामगारवर्गातून होत आहे. या निर्णयाची अमलबजावणी झाल्यास अनेक वर्षे एकाच कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या वेतनात वाढ होणार आहे. सध्या राज्याचे कामगार धोरण व त्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबद्दलची चर्चा सुरू असते.या क्षेत्रातील किमान कौशल्य असलेल्या कामगारांच्या वेतनाचा प्रश्न ऐरणीवर असतो. आता तो अभियांत्रिकीमधील कामगारांसाठी शासनाने वर्गवारी व परिमंडल निहाय प्रतिमहा किमान वेतन जाहीर केले आहे. याअनुषंगाने मिळणाऱ्या विशेष सवलती, भत्ते याबाबत वेगळे निद९र््श दिले आहेत. या सुधारीत वेतनश्रेणीमुळे कामगार समाधान व्यक्त करीत आहेत. कामगार क्षेत्रातील या नव्या वेतनश्रेणीचा परिणाम सकारात्मक दिसण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)