सराफांचा आज राज्यस्तरीय लाक्षणिक संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:33 IST2021-08-23T04:33:41+5:302021-08-23T04:33:41+5:30
रत्नागिरी : ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्डने (बीआयएस) हॉलमार्किंग युनिक आयडी अर्थात एचयुआयडीद्वारे शुध्दता तपासणी पध्दतीमध्ये केलेल्या चुकीच्या व ...

सराफांचा आज राज्यस्तरीय लाक्षणिक संप
रत्नागिरी : ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्डने (बीआयएस) हॉलमार्किंग युनिक आयडी अर्थात एचयुआयडीद्वारे शुध्दता तपासणी पध्दतीमध्ये केलेल्या चुकीच्या व असंविधानिक बदलाच्या निषेधार्थ राज्यभरातील सुवर्णकार सोमवार, दि. २३ ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहेत. रत्नागिरी सराफ संघटनेने या संपात सामील होण्याचा निर्माण घेतला आहे.
ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्डने (बीआयएस) शुध्दतेचा स्टॅम्प दागिन्यांवर मारण्यासाठी हॉलमार्किंग कायदा अमलात आणला. देशातील ज्वेलर्सनी कायद्याचे स्वागतही केले. आत्तापर्यंत त्याची अमलबजावणीसुध्दा चांगल्या पध्दतीने होत होती. मात्र, बीआयएसने शुध्दतेच्या चार प्रमाणित शिक्क्यांमध्ये बदल करत हॉलमार्किंग युनिक आयडीद्वारे शुध्दता तपासणीची चुकीची व असंविधानिक पध्दत आणली. इतकेच नव्हे तर ही आणत असताना सुवर्णकारांच्या शिखर संस्थांबरोबर चर्चा न करता हे बदल करण्यात आले. या पध्दतीमुळे ग्राहकांवर खर्चाचा अतिरिक्त भार पडणार आहे आणि व्यापाऱ्यांनाही पेपर वर्क वाढल्याचा त्रास होणार आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनतर्फे दि.२३ ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. रत्नागिरीतील सराफ संघटना या संपात सहभागी होणार आहे.