मार्गताम्हाणेत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
By Admin | Updated: January 20, 2015 23:48 IST2015-01-20T23:20:39+5:302015-01-20T23:48:40+5:30
उद्घाटन राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार रमेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले

मार्गताम्हाणेत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
अडरे : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील सूरज तथा बाबू चव्हाण यांच्या स्मतिप्रित्यर्थ आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार रमेश कदम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू, मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माजी आमदार मधुकर चव्हाण, पंचायत समिती सदस्य जितेंद्र चव्हाण, उद्योजक नीलेश चव्हाण, प्रतापराव शिंदे, कबड्डी असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष मुरलीधर नार्वेकर, रमाकांत सकपाळ, मंगेश पवार, राज्य कबड्डी निरीक्षक प्रशांत चव्हाण, प्रो कबड्डी असोसिएशनचे गिरीष उरणकर, मनोहर इंदुलकर, सुनील चव्हाण, मिलिंद विखारे, विष्णू कांबळी, दिलीप पेढांबकर, मधुकर शिंदे, यशवंत गोेंधळी, नंदू सावंत, संदीप चव्हाण, रामदास राणे, नंदू थरवळ, डॉ. मनोहर राणे, नीलम गोंधळी, योगिता खाडे, अतुल शिर्के, सुभाष चव्हाण, गणेश साळवी, दिलीप कारेकर उपस्थित होते. या स्पर्धा पद्मावती क्रीडा संकुलामध्ये खेळविल्या जात आहेत. या स्पर्धेमध्ये न्यू हिंद विजय चिपळूण, संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण, भोम कबड्डी संघ, विजय नवनाथ संघ, मुंबई, गजानन संघर्ष संघ केळशी, दसपटी क्रीडा मंडळ संघ दसपटी, चेरोबा क्रीडा मंडळ, पालघर, टागोरनाथ मित्र मंडळ, मुंबई उपनगर हे संघ सहभागी झाले आहेत. (वार्ताहर)