खेड : तालुक्यातील तिसंगी-पिंपळवाडी परिसरातील नदीकिनारी गावठी हातभट्टीच्या दारू अड्डयावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला . यात २ लाख २० हजार रूपयांचा ऐवज जप्त करत दोघांना ताब्यात घेतले. अजित अनंत भोसले, रोशन सुभाष भोसले (रा. तिसंगी- पिंपळवाडी) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.यातील मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या खेड विभागाचे प्रभारी निरीक्षक शंकर जाधव व पथकाने छापा टाकला . यात गूळ व नवसागर मिश्रित रसायनाने भरलेल्या ५०० लीटरच्या १७ टाक्या जप्त केल्या. टाक्यांमध्ये ९ हजार लीटर रसायन आढळले.भट्टी लावण्यासाठी १ हजार लीटरची लोखंडी पत्रीटाकी, डेचके तसेच ७० लीटर गावठी दारू जप्त केली. या पथकात दुय्यम निरीक्षक व्ही. व्ही. सकपाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आर. बी. भालेकर, जवान ए. के. बर्वेचा समावेश होता.
तिसंगीत राज्य उत्पादन शुल्कची हातभट्टीवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 14:22 IST
liquor ban Police Ratnagiri : खेड तालुक्यातील तिसंगी-पिंपळवाडी परिसरातील नदीकिनारी गावठी हातभट्टीच्या दारू अड्डयावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला . यात २ लाख २० हजार रूपयांचा ऐवज जप्त करत दोघांना ताब्यात घेतले. अजित अनंत भोसले, रोशन सुभाष भोसले (रा. तिसंगी- पिंपळवाडी) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
तिसंगीत राज्य उत्पादन शुल्कची हातभट्टीवर छापा
ठळक मुद्देतिसंगीत राज्य उत्पादन शुल्कची हातभट्टीवर छापा२ लाख २० हजार रूपयांचा ऐवज जप्त, दोघांना ताब्यात