शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

विणीच्या हंगामाला प्रारंभ, वेळास किनारी समुद्राकडे झेपावली कासवाची ३८ पिल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 16:54 IST

वेळास येथील समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या कासव मादीने घरटे तयार केले होते

मंडणगड : तालुक्यातील वेळास समुद्रकिनाऱ्यावर सागरी कासव संवर्धन मोहिमेअंर्तगत संरक्षित केलेल्या कासवांच्या अंड्यातून गुरुवारी (दि.१२) पिल्ले बाहेर पडण्यास सुरुवात झाली. पहिल्या घरट्यातून बाहेर आलेली ३८ कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. यंदाच्या हंगामात सर्वप्रथम वेळास येथे कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले आहे.सन २०२२च्या हंगामात वनविभागाच्या माध्यमातून १५ नोव्हेंबर २०२२ रोजी वेळास येथील समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या कासव मादीने पहिले घरटे तयार केले होते. या घरट्यामध्ये १०२ अंडी संरक्षित करण्यात आली होती. या संरक्षित अंड्यांमधून बाहेर पडलेल्या २६ पिल्लांना गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास समुद्रात सोडण्यात आली. त्यानंतर सायंकाळी आणखी १२ पिल्लांना संरक्षित समुद्रात सोडण्यात आले. हंगामातील ही पहिलेच पिल्ले समुद्राकडे झेपावली आहेत.ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरट्यांच्या नोंदी एम. टर्टल ॲपमध्ये केल्या जाणार आहेत. कासव संवर्धन मोहीम चिपळूणचे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहायक वनरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे. गुरुवारी कासवांची पिल्ले समुद्रात साेडताना दापाेलीचे परिक्षेत्र वनअधिकारी वैभव बोराटे, मंडणगडचे वनपाल अनिल दळवी, वन व्यवस्थापन समितीचे सुनील पाटील, हाेम स्टे संघटनेच्या अध्यक्ष धनश्री काचे, कासवमित्र देवेंद्र पाटील उपस्थित हाेते.

गत हंगामात १२ हजार पिल्ले समुद्राकडे२०२१-२२चे हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर एकूण १४ हँचरीमधून ३१७ घरटी संरक्षित करण्यात आली होती. या घरट्यांमधून एकूण ३३,६०९ अंडी संरक्षित करण्यात आली होती. घरट्यातील अंड्याचे वनविभाग व कासवमित्रांकडून संरक्षण व संवर्धन करून १२,०१४ इतकी पिल्ले समुद्रात सोडण्यात आली होती. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग