पेरणीआधी उखळीची नांगरणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:29 IST2021-05-24T04:29:54+5:302021-05-24T04:29:54+5:30
वादळ पावसाचा विपरीत परिणाम शेतीची उलट कामे लाेकमत न्यूज नेटवर्क असुर्डे : चक्रीवादळानंतर पावसाची संततधार सुरू राहिल्याने चिपळूण तालुक्यातील ...

पेरणीआधी उखळीची नांगरणी सुरू
वादळ पावसाचा विपरीत परिणाम
शेतीची उलट कामे
लाेकमत न्यूज नेटवर्क
असुर्डे : चक्रीवादळानंतर पावसाची संततधार सुरू राहिल्याने चिपळूण तालुक्यातील कोकरे असुर्डे परिसरात नांगरणीचे पहिले तास म्हणजे उखळीला सुरुवात झाली आहे. जून महिन्यात सुरू होणारी शेतीची कामे यावर्षी मे महिन्याच्या मध्यावरच सुरू झाली आहेत.
सर्वसाधारण मे महिन्यात रोहिणी नक्षत्रात पेरणी सुरू होते. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यावर उखळीचे तास सुरू होते. परंतु, यावर्षी तौक्ते वादळामुळे निसर्गावर विपरीत परिणाम झाला आहे. मे महिन्याच्या मध्यावर सतत पाच दिवस पाऊस पडल्याने सर्व शेते खोलवर ओली होऊन माती नरम झाल्याने शेतामध्ये नांगर सहज लागत आहे. निसर्गाच्या असंतुलितपणामुळे शेतकऱ्यांची कामेही उलट्या गतीने सुरू झाली आहेत. पेरणीआधी उखळीचे तास सुरू झाले.