केशरी कार्डधारक धान्य योजना सुुरु करावी
By Admin | Updated: February 6, 2015 00:39 IST2015-02-05T20:27:17+5:302015-02-06T00:39:58+5:30
राष्ट्रवादीचे निवेदन : चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस बैठकीनंतर केली मागणी

केशरी कार्डधारक धान्य योजना सुुरु करावी
चिपळूण : केशरी कार्डधारक एपीएल धान्य योजना त्वरित सुरु करावी व रॉकेलचा कोटा पूर्ववत करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज मंगळवारी तहसीलदार वृषाली पाटील यांना निवेदन देण्यात आले.चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पाग महिला विद्यालयाच्या सभागृहात तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी, महिला आघाडी तालुकाध्यक्ष चित्रा चव्हाण, सभापती समिक्षा बागवे, नगराध्यक्ष सावित्री होमकळस, शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर, नगरसेवक सुचय रेडीज, राजू कदम, शिल्पा खापरे, रूक्सार अलवी, आदिती देशपांडे, निर्मला चिंगळे, इनायत मुकादम, शहाबुद्दिन सुर्वे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कदम, दिलीप माटे, बाळकृष्ण जाधव, माजी उपसभापती राजाभाऊ चाळके, माजी सभापती सुरेश खापले, राजन कुडाळकर, बाबा लाड, युवक अध्यक्ष मयुर खेतले, विलास चिपळूणकर उपस्थित होते. गेल्या तीन महिन्यात आघाडी सरकारने सर्वसामान्यांसाठी सुरु केलेली, योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केशरी कार्डधारकांना तीन महिने धान्य मिळत नाही. त्यांचे हाल होत आहेत. अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी होत नाही. याबद्दल नाराजी व्यक्त करुन तालुकाध्यक्ष खताते यांनी सरकारचा निषेध केला. कार्यकर्त्यांनी मरगळ झटकावी. शहरातील पक्षाचे कार्यालय सुरु झाले असून, पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक यांनी येऊन लोकांच्या येथे गाठीभेटी घ्याव्यात. पक्षात शिस्त आणण्याची गरज आहे. गैरहजर असणाऱ्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना आपण कारणे दाखवा नोटीस बजावणार आहोत असे स्पष्ट केले. सत्तेत आल्यापासून रॉकेलच्या कोट्यात कपात केली आहे. रेशनवर रॉकेल व धान्य मिळत नसल्याने सर्वसामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे. शासनाने निर्णय घ्यावेत. शासनाने ठोस उपाययोजना न केल्यास चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही तालुकाध्यक्ष खताते यांनी दिला. (प्रतिनिधी)