मालगुंड येथे गाडीवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 13:25 IST2017-10-01T13:25:12+5:302017-10-01T13:25:29+5:30
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील भूषण मयेकर यांच्या गाडीवर काल (शनिवारी) रात्री काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये गाडीची समोरील काच फुटली आहे. त्याचबरोबर याठिकाणी रात्री वस्तीला आलेल्या एसटी बसवरही दगडफेक करण्यात आली आहे.

मालगुंड येथे गाडीवर दगडफेक
रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड येथील भूषण मयेकर यांच्या गाडीवर काल (शनिवारी) रात्री काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये गाडीची समोरील काच फुटली आहे. त्याचबरोबर याठिकाणी रात्री वस्तीला आलेल्या एसटी बसवरही दगडफेक करण्यात आली आहे.
मालगुंड ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून, राजकीय द्वेषातूनच ही दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अद्याप पोलीस स्थानकात कोणीही तक्रार दिली नसल्याची माहिती जयगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक इंद्रजित काटकर यांनी सांगितले.
मालगुंड ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीचे राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे.
निवडणुकीसाठी परिवर्तन पॅनेलची स्थापना करण्यात आली असून, या पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविली जात आहे. शनिवारी रात्री येथीलच भूषण मयेकर यांच्या बोलेरो गाडीवर काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे.
या घटनेनंतर भूषण मयेकर यांच्या घराजवळून दोन दुचाकीस्वार धूमस्टाईने पळून गेल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले. या दगडफेकीमध्ये गाडीचे नुकसान झाले आहे. तर मालगुंड येथे वस्तीला आलेल्या गुहागर आगाराच्या बसवरही काहींनी दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे.