महिलेच्या हातावर सुरीने वार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:29 IST2021-03-21T04:29:39+5:302021-03-21T04:29:39+5:30
रत्नागिरी : बाथरूमचे पाणी खिडकीजवळ सोडल्याचा जाब विचारला म्हणून महिलेच्या हातावर सुरी मारून दुखापत केल्याची घटना राजीवडा येथे ...

महिलेच्या हातावर सुरीने वार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी : बाथरूमचे पाणी खिडकीजवळ सोडल्याचा जाब विचारला म्हणून महिलेच्या हातावर सुरी मारून दुखापत केल्याची घटना राजीवडा येथे गुरुवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या दरम्याने घडली. याप्रकरणी तिघांविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दानिश मुजावर, अमीर मुजावर आणि रियाज सुवर्णदुर्गकर (सर्व रा. राजीवडा, रत्नागिरी) अशा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. रिहाना गफार पकाली (४५, रा. राजीवडा, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे दानिशने त्याच्या बाथरूमचे पाणी पाईपद्वारे पकाली यांच्या खिडकीजवळ सोडलेस हाेते. तेव्हा पकाली यांनी त्याला माझ्या खिडकीजवळ पाणी का सोडलेस, तुझ्या घराचा पत्रा माझ्या भिंतीला का चिकटवलास, असा त्याला जाब विचारला. याचा राग आल्याने अमीर मुजावरने रिहाना यांना धरून ठेवले आणि रियाज सुवर्णदुर्गकरने त्यांच्या डाव्या मनगटावर सुरी मारली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.