लांजात पावसाच्या तुरळक सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:25 IST2021-05-30T04:25:34+5:302021-05-30T04:25:34+5:30

लांजा : लांजात शनिवारी सायंकाळी विजाच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी ...

Sporadic showers in Lanjat | लांजात पावसाच्या तुरळक सरी

लांजात पावसाच्या तुरळक सरी

लांजा : लांजात शनिवारी सायंकाळी विजाच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडल्याने हवेमध्ये गारवा निर्माण झाला हाेता. त्यामुळे

सकाळपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

तालुक्यात शनिवारी सायंकाळी ३.३० वाजता तसेच ५.३० वाजता ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडल्याने वातावरणात गारवा आला हाेता. दुपारी अचानक आकाशात काळे ढग जमायला सुरुवात झाले. ग्रामीण भागातील अजूनही आगोटची असलेली कामगिरी आटोक्यात आलेली नसताना पावसाने मे महिन्याच्या अखेरीस पडलेल्या या पावसाने नागरिकांची धावपळ उडाली. तसेच शहरामध्ये कामाला आलेल्या नोकरदारांचे कार्यालय सुटल्यानंतर हाल झाले़ सगळ्यांना पाऊस थांबण्याची वाट पाहावी लागली़ पावसाचे प्रमाण कमी होताच अनेकांनी आपले घर गाठले़

Web Title: Sporadic showers in Lanjat