चिपळूण युवासेनेच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST2021-05-11T04:33:48+5:302021-05-11T04:33:48+5:30
चिपळूण : कोरोना काळात रक्ताचा भासणारा तुटवडा पाहता, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार चिपळूण तालुका युवा सेनेने ...

चिपळूण युवासेनेच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
चिपळूण : कोरोना काळात रक्ताचा भासणारा तुटवडा पाहता, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार चिपळूण तालुका युवा सेनेने चिपळूण शहरात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः ६५ तरुण-तरुणींनी स्वयंफूर्तीने शिबिरात सहभागी होत रक्तदान केले.
चिपळूण तालुका युवा सेना तालुकाप्रमुख उमेश खताते, शहरप्रमुख निहार कोवळे आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत चिपळूण शहरातील बांदल हायस्कूल सभागृहात सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे, राजू देवळेकर, शहरप्रमुख उमेश सकपाळ, महिला संघटक सुप्रिया सुर्वे, माजी नगरसेवक संजय रेडीज, उपशहरप्रमुख भय्या कदम उपस्थित होते.
या शिबिरात तरुण-तरुणींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून ६५ तरुण-तरुणींनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराला रक्तपेढी तसेच सर्व यंत्रणा पुरविण्यासाठी विक्रांत जाधव यांनी सहकार्य केले. या रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच शिबिर यशस्वी होण्यासाठी तालुकाप्रमुख उमेश खताते, शहरप्रमुख निहार कोवळे यांच्यासह तालुका सचिव प्रतीक शिंदे, शहर अधिकारी विधानसभा आयटी सेल अधिकारी विशाल ओसवाल, उपतालुका अधिकारी अवधूत शिर्के, दीपक मोरे, महेश शिंदे, ऋषिकेश नलावडे, युवती सेना उपतालुका अधिकारी शिवानी कासार, साहिल शिर्के, प्रार्थ जागुष्टे, विनोद पिल्ले, आयटी सेल विभाग अधिकारी सौरभ कदम, विनीत शिंदे, ओमकार गायकवाड, मनिष शिर्के, देवेंद्र शिंदे, संकेत नलावडे, मुबारक सकवारे, अजिंक्य पवार, अमय चितळे, नीलेश आवले, शिवानी शिंदे, सुप्रदा दळवी, प्रसाद कोलगे यांनी मेहनत घेतली.