प्रलंबित प्रकरणांबाबत विशेष मोहीम

By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-24T22:56:10+5:302015-07-25T01:13:32+5:30

अधिकाऱ्यांचा उपक्रम : धर्मादाय आयुक्तांचा विशेष कार्यक्रम, लाभ घेण्याचे आवाहन

Special campaign on pending cases | प्रलंबित प्रकरणांबाबत विशेष मोहीम

प्रलंबित प्रकरणांबाबत विशेष मोहीम

रत्नागिरी : धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे महाराष्ट्र सार्वजनिक न्यास नोंदणी अधिनियम १९५० नुसार नोंद होणाऱ्या संस्थांची संख्या प्रचंड आहे. जिल्ह्यात या कायद्यान्वये सुमारे ७ हजारांहून अधिक न्यास नोंद आहेत. यामध्ये सार्वजनिक मंदिरे, उत्सव मंडळे, सार्वजनिक वाचनालये, शैक्षणिक संस्था, चर्च व इतर धर्मादाय न्यासांचा समावेश होतो.
यामधील कायदेशीर बाबींच्या अज्ञानामुळे विश्वस्तांना एकदा न्यास नोंदणी झाल्यानंतर बदल नोंद करणेविषयी पुरेशी माहिती नसल्याचे दिसून येते. त्यामुळे विश्वस्त हे बदल अर्ज स्थावर, जंगम मालमत्ता नोंदीकरिता अर्ज किंवा घटना व नियमावली दुरुस्ती अर्ज कार्यालयात दाखल केल्यानंतर त्यातील कागदपत्रांची योग्य पूर्तता करण्याबाबत अनभिज्ञ असतात. कार्यालयातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे या सर्व प्रकरणांचा पाठपुरावा करणे शक्य होत नाही. या सर्व बाबींचा विचार करुन धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, रत्नागिरी, विभाग रत्नागिरी या कार्यालयात प्रलंबित असणारी प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टीने एक विशेष मोहीम राबवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
दि. २४ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर २0१५ पर्यंत विशेष मोहीम कालावधी राहणार आहे. या मोहिमेंतर्गत कार्यालयात दाखल असणारी अवादग्रस्त प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याविषयी कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासंबंधी विश्वस्तांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, रत्नागिरी विभाग, रत्नागिरी, सुरभी अपार्टमेंट, दुसरा मजला, एस. व्ही. रोड, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे संपर्क साधून प्रकरणाची सद्यस्थिती व आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेविषयी लवकरात लवकर माहिती घेऊन सभा इतिवृत्त रजिस्टर, नोटीस रजिस्टर व इतर कागदपत्र सादर करावीत. दीर्घकाळापासून प्रलंबित असणारी प्रकरणे या विशेष मोहिमेमध्ये निकाली काढावीत, असे अधीक्षक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, रत्नागिरी विभागातर्फे कळवण्यात आले आहे. याबाबत सर्व संबंधितांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे करण्यात आल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Special campaign on pending cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.