शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
2
फक्त ५० मिनिटे उरली! आझाद मैदान रिकामे करा; हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलीस एक्शन मोडमध्ये
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: २४ तासांची परवानगी, मग आता तुम्ही कोणत्या अधिकारात तिथे बसला आहात; हायकोर्टाचा सवाल
4
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
5
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
6
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
7
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
8
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
9
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
10
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
11
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
12
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
13
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
14
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
15
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट
16
Mumbai: डहाणूच्या चंद्रसागर खाडीत अवतरले पक्षीवैभव
17
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
18
मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता फुटेल ‘हायड्रोजन बॉम्ब’; राहुल गांधींचा इशारा
19
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
20
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...

Ratnagiri: कधी राजकारण, नियमात अडकले चिपळुणातील प्रकल्प; भवितव्य अजून अंधारातच

By संदीप बांद्रे | Updated: July 18, 2025 14:00 IST

सर्व कामांमध्ये राजकारण शिरले

संदीप बांद्रेचिपळूण : गेल्या २० वर्षांपासून चिपळूण शहरातील विविध प्रकल्पांना अक्षरशः खीळ बसली आहे. नगरपरिषदेने हाती घेतलेले प्रकल्प कधी राजकारण, कधी मूल्यांकन, तर कधी तांत्रिक अडचणींमुळे अर्ध्यावरच अडकले आहेत. महर्षी कर्वे भाजीमंडई, मटण मार्केट, महिला क्रीडा संकुल, पवन तलाव स्टेडियमसारख्या प्रकल्पांना प्रशासकीय कारभारात पूर्ण होण्याची अपेक्षाही आता मावळली आहे.चिपळूण नगरपरिषदेने २००५ च्या पूरपरिस्थितीनंतर शहरातील काही प्रकल्पांना नव्याने चालना देण्याचा प्रयत्न केला. विशेषतः कोकणातील पहिले बंदिस्त नाट्यगृह म्हणून ओळख असलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले. एकीकडे हे काम सुरू असतानाच महर्षी कर्वे भाजी मंडई, मटण मार्केट व मच्छी मार्केट, पवन तलाव स्टेडिअम, नारायण तलाव सुभोभीकरण, महिला क्रीडा संकुल यांसारखी कामे एकाच वेळी सुरू केली. मात्र, त्यानंतर या सर्व कामांमध्ये राजकारण शिरले आणि तब्बल १५ वर्षे यातील बहुतांशी प्रकल्प या ना त्या कारणांनी रखडले. त्यातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणाचे काम वादाच्या भोवऱ्यातच कसेबसे पूर्णत्वाला गेले. मात्र, काम करणाऱ्या ठेकेदाराला बिल अदा झालेले नसल्याने प्रकल्प आजही तितकाच वादग्रस्त राहिला आहे.शहरातील रावतळे परिसरातील महिला क्रीडा संकुलाच्या बाबतीतही तितकीच उदासीनता पाहायला मिळते. हा प्रकल्प आता प्रशासनाच्या विस्मरणात गेल्याचा प्रकार आहे. शहरातील महिलांसाठी बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारून तेथे बचत गट व महिला संस्थांना सामावून घेण्याचा प्रयत्न होता; परंतु अनेक वर्षे या प्रकल्पाचे काम अर्धवट स्थितीत असून, या इमारतीवर झाडीझुडपे वाढली आहेत.याच पद्धतीने पवन तलाव स्टेडियमचे कामही वर्षानुवर्षे रखडले आहे. या कामाला अनेकदा चालना देण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यात फारशी प्रगती झालेली नाही. या कामातही लाखो रुपयांचा निधी खर्च करून काम पूर्णत्वाला गेलेले नाही.