गावोगावचे गुंतागुंतीचे प्रश्न सोडविणार : माने

By Admin | Updated: July 23, 2016 23:50 IST2016-07-23T21:37:26+5:302016-07-23T23:50:08+5:30

पुनर्वसन मंत्र्यांची भेट घेणार : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांची बैठक

To solve complex problems of the villages: | गावोगावचे गुंतागुंतीचे प्रश्न सोडविणार : माने

गावोगावचे गुंतागुंतीचे प्रश्न सोडविणार : माने

रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला मिळण्यासाठी आणि पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, प्रत्येक गावात सभा घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधून समस्या जाणून घेऊ, कोंडी फोडण्यासाठी आपण रत्नागिरीत आलात ही ऐतिहासिक गोष्ट आहे. दशक्रोशीतील कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी आम्ही पक्षविरहित काम करू. तसेच प्रकल्पबाधितांना भाजप सरकार आईच्या मायेने प्रेम देईल, असे आश्वासन भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी दिले.
विसूभाऊ पटवर्धन व प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येऊन दत्तमंगल कार्यालयात सभा घेतली. त्यावेळी माने बोलत होते. व्यासपीठावर विसूभाऊ पटवर्धन, दिवाकर आडविरकर आणि केंद्रीय रेल्वे समितीचे सदस्य मनोहर गोठणकर उपस्थित होते.
बाळ माने यांनी केंद्र व राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर आमचीही भूमिका व नैतिक जबाबदारी वाढली असून, मी प्रकल्पाबाबतचे आपले दु:ख समजू शकतो. मी प्रकल्पाचा एजंट नाही. पक्षविरहीत काम झाले पाहिजे. भाजपमध्ये प्रवेश करा, मग काम करतो अशी माझी वृत्ती नाही. पक्षामुळे तुमच्यामध्येच वादंग होऊ नयेत. सर्व समस्या जाणून घेतल्यानंतरच आपण एकत्र काम करू, असे बाळ माने म्हणाले.
पक्षविहरित कामावर भर देऊ. प्रकल्पाबाबत अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल प्रशासन, पुनर्वसन यांच्याकडूनही पूर्ण माहिती घेतली पाहिजे. नुकसानभरपाई वाढली पाहिजे, पाच किलोमीटर परिसरातील गावे बाधित घोषित करावी, याकरिता पुनर्वसन मंत्र्यांची भेट घेऊ, असे माने यांनी सांगितले.
विसूभाऊंनी ग्रामस्थांमधील संभ्रमावस्था मांडली. मोबदला घेतला म्हणजे प्रकल्पाला पाठिंंबा नव्हे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. शासनाने ग्रामस्थांची बाजू मांडून प्रकल्पाशी नवा करार करावा. महामार्ग किंवा विमानतळासाठी लाखो रूपयांची भरपाई दिली जाते. या भरपाईच्या बाबतीत कोकणाला वेगळा न्याय का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. यावेळी राजन लाड, माडबनच्या माजी सरपंच मंदा वाडेकर, आदींसह काही ग्रामस्थांनी व्यथा मांडल्या.
अध्यक्षीय भाषणात दिवाकर आडविरकर यांनी सांगितले की, १९७५च्या सुमारास दिल्ली विश्वविद्यालयातील ४० युवक अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिणामांचे सर्वेक्षण करण्यासाठी जैतापूरला आले होते. या सभेला मिठगवाणे, जैतापूर, जानशी, बाकाळे, सागवे, माडबन आदी दहा गावांतील दीडशे ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: To solve complex problems of the villages:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.