शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
5
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
6
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
7
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
8
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
9
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
10
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
11
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
12
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
13
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
14
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
15
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
16
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
17
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
18
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
19
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
20
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

Ratnagiri News: तिवरे धरण फुटीला मृद, जलसंधारण विभागच जबाबदार; चौकशी समितीने अहवाल पाठवला 

By संदीप बांद्रे | Updated: May 4, 2023 17:35 IST

सव्वा वर्षाचा कालावधी उलटूनही त्यावर कोणतीच कार्यवाही केलेली नसल्याने येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यांनी माहितीच्या अधिकारात सर्वत्र पाठपुरावा सुरू ठेवला हाेता

चिपळूण : तब्बल २२ जणांचा बळी आणि ५४ कुटुंबांच्या संसाराची राखरांगोळी करणाऱ्या तिवरे धरणफुटीला महसूल विभागाचे अधिकारी नव्हे तर मृद आणि जलसंधारण विभागच जबाबदार आहे. धरणाच्या मुख्य भिंतीला तडा जाऊन ती फुटली. यावरून धरणाची दुरुस्ती योग्य प्रकारे केली नसल्याचे तसेच संभाव्य आपत्तीचा विचार करून तातडीच्या उपाययोजना केलेल्या नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे सांगत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी धरणफुटीत चौकशी समितीने ठपका ठेवलेल्या महसूलच्या अधिकाऱ्यांना दोषमुक्त करत आपला अहवाल जलसंधारण खात्याला पाठवला आहे.धरण फुटण्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी प्रारंभी विशेष तपास तपासणी पथक व त्यानंतर नव्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली जलसंधारणचे अपर आयुक्त सुनील कुशिरे, अधीक्षक अभियंता हनुमंत गुनाले यांची पुनर्विलोकन चौकशी समिती नेमली. या समितीने २ वर्षांपूर्वी मार्चच्या पहिल्याच आठवड्यात चौकशी अहवाल शासनाला पाठवला. मात्र, सव्वा वर्षाचा कालावधी उलटूनही त्यावर कोणतीच कार्यवाही केलेली नसल्याने येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यांनी माहितीच्या अधिकारात सर्वत्र पाठपुरावा सुरू ठेवला हाेता. त्यात या दुर्घटनेप्रकरणी धरण ठेकेदारासह जलसंधारण आणि महसूल विभागाच्या अनेक अधिकारी, कर्मचारी यांच्यावर ठपका ठेवत त्यांना जबाबदार धरले. ठेकेदारांवर कारवाई तर दोषी अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून कारवाईची शिफारसही अहवालात केली गेली होती.जिल्हाधिकारी सिंह यांनी मृद व जलसंधारण विभागाला दिलेल्या पत्राची प्रत उपलब्ध झाली. या पत्रानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीत ठपका ठेवलेले तत्कालीन चिपळूण प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडून खुलासे मागवले. त्यानुसार २ जुलै २०१९ रोजी रात्री धरणाच्या मुख्य भिंतीस तडा जाऊन धरणाची मुख्य भिंत फुटली. यावरून जलसंधारण विभागाने धरणाची दुरुस्ती योग्यप्रकारे केली नसल्याचे तसेच संभाव्य आपत्तीचा विचार करून तातडीच्या उपाययोजना केलेल्या नसल्याचे स्पष्ट होत आहे.

विशेष चौकशी पथक यांनी अहवाल सादर केला, त्या अहवालावर आता प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी अहवाल चुकीचा सादर केला की, जिल्हाधिकारी कार्यालय यांनी शासनास अहवाल सादर केला आहे, तो दिशाभूल करणारा आहे. यात तिवरे धरणप्रकरणी ज्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे जीवितहानी व वित्तहानी झाली. त्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, असे वाटत नाही. - विद्याधर साळुंखे, माहिती अधिकारी कार्यकर्ते, चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणDamधरण