श्रीफळाने पळवले तोंडचे पाणी महागाईचा उच्चांक : २२ ते २४ रुपयांपर्यंत दर वाढले
By Admin | Updated: May 15, 2014 00:42 IST2014-05-15T00:32:45+5:302014-05-15T00:42:24+5:30
राजापूर : महागाईने उच्चांक गाठला असताना ऐन लग्नसराईत श्रीफळाने तोंडचे पाणी पळवले आहे. पूर्वी १० ते १५ रुपयांना उपलब्ध होणारा नारळ आता २२ ते २४ रुपयांना विकला जात आहे

श्रीफळाने पळवले तोंडचे पाणी महागाईचा उच्चांक : २२ ते २४ रुपयांपर्यंत दर वाढले
राजापूर : महागाईने उच्चांक गाठला असताना ऐन लग्नसराईत श्रीफळाने तोंडचे पाणी पळवले आहे. पूर्वी १० ते १५ रुपयांना उपलब्ध होणारा नारळ आता २२ ते २४ रुपयांना विकला जात आहे. केरळ आणि बंगळूरुमध्ये खोबर्याचे उत्पादन घटले असून, त्यामुळे सुक्या खोबर्याच्या दरातही दामदुप्पट वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरात ही दुप्पट वाढ झाल्याचे पाहायला मिळते. एप्रिलमध्ये ७० ते ७५ रुपये किलो दराने विकले जाणारे खोबरे आता १४० ते १५० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. हा खोबर्याच्या दराचा उच्चांक असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही वर्षात नारळाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली असली तरीही कोकणात विविध रोग पडल्याने नारळ उत्पादनावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे केरळ आणि बंगळूरू येथून होणारी नारळाची आयात प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दैनंदिन वापरासाठी कोकणात नारळाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यातच आता लग्नसराई असल्याने नारळाला मोठी मागणी आहे. मात्र, मागणीच्या मानाने पुरवठा होत नसल्याने दरात वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात १० ते १५ रुपयांना नारळ उपलब्ध होत होता. तोही आता २२ ते २४ रुपयांना घ्यावा लागत आहे. एका लग्न समारंभात कमीत कमी ७० ते ८० नारळाचा वापर होतो. मे महिन्यात विवाहाचे मुहूर्त जास्त असल्याने याकाळात नारळाची मागणी वाढते. (प्रतिनिधी) राजापुरी खोबरेही महागले फार पूर्वीपासून प्रसिद्ध असलेले राजापुरी खोबरेही दरवाढीत मागे राहिलेले नाही. सध्या घाऊक बाजारात १४० ते १५० रुपये, तर किरकोळ स्वरूपात १५५ ते १६० रुपये प्रतिकिलो दराने राजापुरी खोबरे उपलब्ध आहे. साखरही झाली कडू पश्चिम महाराष्टÑातून येणारी साखरही गेल्या महिनाभरात महाग झाली आहे. २९ ते ३० रुपये असणारा प्रतिकिलो दर ३२ ते ३३ रुपयांपर्यंत गेला आहे. किरकोळ बाजारात साखर ३३ ते ३४ रुपये दराने विकली जात आहे. उसाचे कमी उत्पादन व परदेशातून साखर येत नसल्याने ही दरवाढ झाल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे.