कोरोनामुळे सामाजिक अंतर, अन्यथा संघटनेत एकजूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST2021-07-18T04:23:00+5:302021-07-18T04:23:00+5:30

चिपळूण : तालुक्यातील शिवसेनेची संघटना पहिल्यासारखीच अभेद्य आणि खंबीर आहे. आम्ही सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खांद्याला खांदा लावून संघटनेचे प्रामाणिक ...

Social distance due to corona, otherwise united in organization | कोरोनामुळे सामाजिक अंतर, अन्यथा संघटनेत एकजूट

कोरोनामुळे सामाजिक अंतर, अन्यथा संघटनेत एकजूट

चिपळूण : तालुक्यातील शिवसेनेची संघटना पहिल्यासारखीच अभेद्य आणि खंबीर आहे. आम्ही सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खांद्याला खांदा लावून संघटनेचे प्रामाणिक काम केले आहे आणि करत आहोत. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. कोरोना महामारीच्या संकटामुळे आलेले निर्बंध आणि प्रत्येकाने घ्यावयाची आवश्यक ती काळजी यामुळे आपण सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने गर्दीचे कार्यक्रम टाळत आहोत. पण यामुळे आपल्यामध्ये भावनिक अंतर कधीही पडले नाही आणि पडणारही नाही, असे मत माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी येथे व्यक्त केले.

संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असलेल्या शिवसंपर्क अभियान अंतर्गत तालुक्यातील खेर्डी जिल्हा परिषद गटाची बैठक रविवारी खेर्डी येथील स्वामी मंगल सभागृहात माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, तालुका समन्वयक राजू देवळेकर, ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख संतोष सुर्वे, युवा सेना तालुका अधिकारी उमेश खताते, महिला संघटक सुप्रिया सुर्वे, तालुका सचिव दिलीप चव्हाण हे व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार चव्हाण म्हणाले की, तालुक्यातील शिवसैनिक आणि आपल्यात कधी अंतर राहिलेले नाही व राहणारदेखील नाही. संघटनेसाठी शक्य ते सर्व आपण करत आहोत, असे स्पष्ट केले. जिल्हाप्रमुख सचिन कदम म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या विभागातील गरजेच्या विकासकामांची नोंद करून पक्षाकडे द्या. आपल्या सरकारच्या माध्यमातून ते मंजूर करण्याचा आपण प्रयत्न करू. ग्रामपंचायतीपासून सर्वच निवडणुका शिवसेना म्हणूनच जिंकण्याची तयारी ठेवा. आघाडी वगैरेची चिंता आपण करू नका, त्यासाठी आपली नेतेमंडळी आहेत. आपले संघटना वाढीला प्राधान्य द्या.

या सभेमध्ये युवा सेना उपविभाग अधिकारीपदी राज उतेकर, आय. टी. सेल विभाग अधिकारीपदी प्रीतम शिंदे, उपशाखा अधिकारीपदी अमन कडवेकर यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीचे प्रस्ताविक तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष सुर्वे यांनी केले.

170721\img-20210717-wa0038.jpg

कोरोनामुळे सामाजिक अंतर, अन्यथा संघटनेत एकजूट

चिपळुणातील शिवसंपर्क अभियान बैठकीत माजी आमदार सदानंद चव्हाण यांची स्पष्टीकरण

Web Title: Social distance due to corona, otherwise united in organization