शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

..म्हणून वीज तोडली, अधिकाऱ्यांच्या उत्तराने मंत्री उदय सामंतही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 18:54 IST

अधिकाऱ्यांच्या या उत्तराने मंत्री उदय सामंतही चक्रावून गेले आणि त्यांनी थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर ऊर्जामंत्री राऊत यांनी तत्काळ वीज जाेडण्याचे आदेश दिले.

गणपतीपुळे : आंबा पीक शेती प्रकारात येत नसून हाॅर्टिकल्चर प्रकारात येते. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार वीज ताेडल्याचे उत्तर महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले. अधिकाऱ्यांच्या या उत्तराने मंत्री उदय सामंतही चक्रावून गेले आणि त्यांनी थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर ऊर्जामंत्री राऊत यांनी तत्काळ वीज जाेडण्याचे आदेश दिले.

गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथील अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गणपतीपुळे येथे आढावा बैठक आयाेजित केली हाेती. यावेळी त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आंबा बागायतदार शेतकऱ्यांची वीज कनेक्शन ताेडल्याची माहिती मंत्री सामंत यांना कळताच त्यांनी सभेतच कार्यकारी अभियंता यांना जाब विचारला. शासन निर्णय शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडायची नसतानाही ही वीज कनेक्शन का तोडण्यात आली? असा प्रश्न त्यांनी केला.या प्रश्नाला उत्तर देताना कार्यकारी अभियंता यांनी आंबा पीक हे शेती प्रकारात येत नसून ते हाॅर्टिकल्चर प्रकारात येते. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार ही वीज तोडल्याचे उत्तर दिले. त्यावर कोकणातील आंबा पीक हे शेती प्रकारात येत नाही हा जावईशोध कसा लावला? अशी विचारणा मंत्री सामंत यांनी केली.त्यानंतर त्यांनी तत्काळ राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून दिली. यावेळी ऊर्जामंत्री राऊत यांनी तोडलेली वीज कनेक्शन आजच्या आज जोडून देण्याचे आदेश कार्यकारी अभियंता यांना दिले. तसेच शेतकऱ्यांच्या बाबतीत स्वतःचे विचार अंमलात न आणता शासनाची भूमिका बजवावी, अशी समजही दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीelectricityवीजUday Samantउदय सामंत