शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

हरणाच्या शिंगांची तस्करी, मंडणगडात दोघांना पाठलाग करुन पकडले

By अरुण आडिवरेकर | Updated: July 21, 2023 18:57 IST

मंडणगड : खासगी गाडीतून हरणाच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या दाेघांना बाणकाेट सागरी पाेलिस स्थानक आणि मंडणगड पाेलिसांच्या पथकाने थरारक पाठलाग ...

मंडणगड : खासगी गाडीतून हरणाच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या दाेघांना बाणकाेट सागरी पाेलिस स्थानक आणि मंडणगड पाेलिसांच्या पथकाने थरारक पाठलाग करत पकडले. त्यांच्याकडून शिंगे हस्तगत करण्यात आली आहेत. ही कारवाई १९ जुलै २०२३ रोजी दुपारी ४:३५ वाजता करण्यात आली. राहुल दिलीप भोसले (२४, रा. नवानगर पिंपळवाडी - तिसंगी, ता. खेड) व विनिता फिलीफ केसकर (५३, रा. एकवीरा नगर - कुंभारवाडा, ता. खेड) अशी दाेघांची नावे आहेत.गस्त घालत असताना वन्यजीव प्राण्याच्या अवयवाची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पाेलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने बाणकोट पोलिसांनी देव्हारे येथे तात्काळ नाकाबंदी करत वाहनांची तपासणी सुरु केली. दरम्यान, संशयित गाडी येताना दिसताच पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनकाचालकाने पोलिसांना हुलकावणी देत नाकांबदीतून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरु केला.अखेर पोलिस निरीक्षक शैलजा सावंत यांनी मंडणगड तहसील कार्यालयासमोर नाकाबंदी केली. याठिकाणी ही गाडी थांबवून राहुल दिलीप भोसले आणि विनिता फिलीफ केसकर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी गाडीतून फेकून दिलेली पिशवी व त्यातील हरणाची दोन शिंगे पोलिसांनी ताब्यात घेतली.या दोघांचे विरोधात भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९(१), ४४, ४९, ५१, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच स्विप्ट डिझायर गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. याबाबत सहायक पोलिस फौजदार नारायण आळे यांनी फिर्याद दिली आहे. बाणकोट पोलिस अधिक तपास करत असून, दाेघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस