शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: दापोलीत खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी, वृद्धाला अटक 

By मनोज मुळ्ये | Updated: August 11, 2023 17:46 IST

कारवाईत ११.६७८ किलाे ग्रॅम वजनाची खवले जप्त

दापाेली : दापाेली पाेलिस स्थानकाच्या हद्दीतील साेंडेघर ते मंडणगड या मार्गावरील शिरखल आदिवासीवाडी येथे छापा टाकून खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एका वृद्धाला अटक केली आहे. ही कारवाई रत्नागिरी दहशतवाद विराेधी शाखा आणि दापाेली वन विभागाने १० ऑगस्ट राेजी दुपारी १:४० वाजता केली. बाळा गणपत लोंढे (८२, रा. कोर्टीवाडी, पालगड, ता. दापोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.सोंडेघर ते मंडणगड या मार्गावरील शिरखल आदिवासी वाडी येथे एक जण खवले मांजराच्या खवल्यांची विक्री करिता वाहतूक करणार आहे, अशी विश्वसनीय माहिती पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे रत्नागिरीच्या दहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक भरत पाटील व पथकाने वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर दापोली वन विभागाचे वन रक्षक गणपती महादेव जळणे यांना सोबत घेऊन छापा टाकला.या छाप्यामध्ये बाळा गणपत लोंढे हा सोंडेघर ते मंडणगड जाणाऱ्या मार्गावरील पालगड येथील शिरखल आदिवासी फाटा येथे वन्यजीव खवले मांजराची खवले तस्करीच्या उद्देशाने, बेकायदेशीरपणे स्वत:च्या ताब्यात बाळगून त्याची विक्री करण्यासाठी वाहतूक करताना आढळला. या कारवाईत ११.६७८ किलाे ग्रॅम वजनाची खवले जप्त करण्यात आली आहेत.ही कारवाई दहशतवाद विराेधी शाखेचे सहायक पाेलिस निरीक्षक भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस हवालदार राजेश भुजबळराव, उदय चांदणे, लक्ष्मण कोकरे, महेश गुरव, आशिष शेलार, सुरक्षा शाखेचे सहायक पाेलिस फाैजदार प्रशांत बोरकर, पाेलिस हवालदार ओंकार सावंत, वन रक्षक गणपती जळणे यांनी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीdapoli-acदापोली