शहरं
Join us  
Trending Stories
1
NDA सरकारचा फॉर्म्युला ठरला! ४ महत्त्वाची खाती भाजपाकडे, एकनाथ शिंदेंना काय मिळणार?
2
किती आमदार संपर्कात?; जयंत पाटलांच्या एका वाक्याने वाढवली अजित पवारांच्या पक्षाची धाकधूक!
3
काँग्रेसच्या खासदारांचं शतक पूर्ण.! ठाकरेंची मशाल पाडून विशाल काँग्रेसमध्ये दाखल
4
"...तर आपण सर्वांनी उपोषणाला बसायचे आहे, मी स्वतः उपोषणाला बसणार"; सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा
5
विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजितदादांविरोधात युगेंद्र पवार मैदानात? आव्हाडांचे सूचक भाष्य
6
शेअर मार्केटमधील सर्वात मोठा घोटाळा, लोकांचे ३० लाख कोटी बुडाले; राहुल गांधींचा मोदी-शाह यांच्यावर गंभीर आरोप
7
याला म्हणतात परतावा! 1 वर्षात पैसा डबल, आजही 15% नं वाढला भाव; आता कंपनी स्प्लिट करणार शेअर?
8
TDP आणि BJP मध्ये झालं एकमत; सरकारमध्ये सहभागी होण्याचा 'असा' ठरला फॉर्म्युला?
9
नितीश कुमारांच्या अनावश्यक मागण्या मान्य करणार नाही; भाजपने स्पष्टच सांगितले...
10
2019 मध्ये जे घडले त्याचे सूत्रधार देखील एकनाथ शिंदे; काळेंशी गळाभेटीनंतर अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट 
11
उद्धव ठाकरे पुन्हा एनडीए'मध्ये जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
12
कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने मारली कानाखाली
13
भाजपा खासदार नारायण राणेंनी शिवतीर्थ निवासस्थानी घेतली राज ठाकरेंची भेट
14
400 पारचा नारा खोटा होता, माझे स्वतःचे कार्यकर्ते नसते तर हारलो असतो! भाजप खासदाराचा घरचा आहेर
15
वयाच्या २५ व्या वर्षी बनल्या खासदार; कोण आहेत हे युवा चेहरे, जे संसदेत पोहचले?
16
“आमचा ८० टक्के स्ट्राइक रेट, विधानसभेला १८० जागा निवडून येतील”; जयंत पाटील यांचा दावा
17
लाचखोरीचं गुजरात मॉडेल, भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लाच देण्यासाठी दिली EMI सुविधा 
18
राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? अखिलेश यादव म्हणाले, "पुण्याचे काम करताना जर..."
19
नितीश कुमारांनी मागितली 'ही' ३ महत्त्वाची खाती; भाजपाची वाढणार डोकेदुखी?
20
सुप्रिया सुळेंविरोधात नामदेवराव जाधवांना, अन् बिचुकलेंना कल्याण, साताऱ्यात किती मते मिळाली? आकडा पाहून काय म्हणाल

लघु पाटबंधारे योजना कागदावरच, रत्नागिरी जिल्ह्यातील ५६पैकी ६ योजनांचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 4:33 PM

लघुसिंचन तसेच मध्यम योजनांची कामे रखडलेली असल्यामुळे जिल्ह्यातील लघु पाटबंधारे योजनांची स्थिती अत्यंत खालावत चालली आहे. गेली अनेक वर्षे शासनाच्या या योजना कागदावरच दिसत आहेत. जिल्ह्यातील एकूण ५६ योजनांपैकी केवळ ६ योजनांची कामे पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे.

ठळक मुद्देलघु पाटबंधारे योजना कागदावरच,  पाटबंधाऱ्यातील पाणी पातळी खालावलीरत्नागिरी जिल्ह्यातील ५६पैकी ६ योजनांचे काम पूर्ण

खेड : लघुसिंचन तसेच मध्यम योजनांची कामे रखडलेली असल्यामुळे जिल्ह्यातील लघु पाटबंधारे योजनांची स्थिती अत्यंत खालावत चालली आहे. गेली अनेक वर्षे शासनाच्या या योजना कागदावरच दिसत आहेत. जिल्ह्यातील एकूण ५६ योजनांपैकी केवळ ६ योजनांची कामे पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे.याबाबतची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, रत्नागिरी यांच्याकडून केतन भोज यांना माहितीच्या अधिकाराखाली देण्यात आली आहे. आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील एकूण ५६ योजनांपैकी फक्त तुळशी (मंडणगड), गोपाळवाडी (राजापूर), शेल्डी (खेड), कशेळी (राजापूर), तांबडी (संगमेश्वर) व जमागे भवरा (खेड) या ६ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत.

उर्वरित योजना या बांधकामाधीन असल्याचे स्वत: जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी माहिती अधिकारात स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुळातच ही बाब अत्यंत गंभीर असून, जिल्ह्याच्या मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.एवढे महत्त्वाकांक्षी लघु पाटबंधारे प्रकल्प आणि मध्यम स्वरूपाच्या योजना जिल्ह्यात असूनही प्रकल्पांचे काम अतिशय मंद गतीने सुरू आहे. जिल्ह्यात लघु पाटबंधारे प्रकल्पाचे दायित्व मोठे असल्याने त्याचा प्राधान्यक्रम ठरवून पुढील येत्या काही वर्षात शेतकऱ्यांना लाभ पोहोचू शकणाऱ्या प्रकल्पांना प्राधान्य देण्यात यायला हवे, अशी केतन भोज यांची मागणी आहे.

तसेच बांधकामाधीन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य शासनामार्फत होत असलेली तरतूद मर्यादित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लघु पाटबंधारे प्रकल्पांचे महत्त्व जाणून, निधी उपलब्धतेच्या विविध पर्यायांबाबत शासनानेही गंभीरतेने विचार करायला हवा. दुसरीकडे प्रकल्प जलद गतीने व कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी राजकीय महत्त्वाकांक्षा, प्रशासकीय इच्छाशक्ती महत्त्वाची असते ती याठिकाणी कुठेही दिसत नाही.प्रकल्पांची कामे पूर्ण न झाल्याने त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम जिल्ह्यातील खेड्यापाड्यांवर दिसत आहे. विविध ठिकाणी पाणी व्यवस्थापनाची सोय नसल्यामुळे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊन तेथील ग्रामस्थांना त्याचा सामना करत त्या पाणी टंचाईला दोन हात करावे लागत आहे. ज्या - ज्या भागात पाणी टंचाई निर्माण होत आहे. त्याठिकाणी जलव्यवस्थापनासाठी कार्य करणाऱ्या व श्रमदान करण्याऱ्या जल फाऊंडेशन कोकण विभाग सारखी स्वयंसेवी संस्था त्या गावात जाऊन लोकवर्गणीतून पाणी टंचाई जाणवत असलेल्या ठिकाणी श्रमदान करुन तेथील ग्रामस्थांसाठी पाण्याची व्यवस्था करत आहे.

त्यामुळे शासनाने ही आपली जबाबदारी झटकून चालणार नाही. जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी या विषयाचे गांभीर्य ओळखून मृद व जिल्हा जलसंधारण विभागाने आपल्या अखत्यारित येणाऱ्या जिल्ह्यातील मध्यम आणि लघुसिंचन योजनांची बांधकामाधीन कामे तत्काळ पूर्ण करावीत, अशी मागणी भोज यांनी पत्राने केली आहे.आर्थिक दुबळेपणाआर्थिक तरतुदीच्या दुबळेपणामुळे या प्रकल्पांच्या आणि योजनांच्या मार्गात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे जिल्ह्यातील लघु पाटबंधारे सिंचन क्षेत्र आक्रसले आहे. एकंदरीतच या योजनांची कामे रेंगाळत राहिल्यामुळे त्यावरील खर्च ही त्याच गतीने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्प हे केवळ निधीअभावी रखडलेले आहेत. त्याशिवाय अनेक प्रकल्पांची कामे ठप्प पडली आहेत. काही प्रकल्पांचे कालवेच काढण्यात आलेले नसल्याने पाणी असूनही तेथील भागाला पाणी मिळू शकत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. तरीही शासन याबाबत उदासिन असल्याचेच दिसत आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारRatnagiriरत्नागिरी