शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

लोटेत सहावा स्फोट; सुदैवाने कोणी जखमी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:39 IST

आवाशी : गेल्या चार महिन्यांतील स्फोट आणि आगीच्या सहाव्या घटनेने लोटे परिसर पुन्हा एकदा हादरला. बुधवारी सकाळी अकरा वाजता ...

आवाशी : गेल्या चार महिन्यांतील स्फोट आणि आगीच्या सहाव्या घटनेने लोटे परिसर पुन्हा एकदा हादरला. बुधवारी सकाळी अकरा वाजता लोटे - परशुराम (ता. खेड) येथील एमआर स्पेशालिटी केमिकल्स प्रा. लि. या कंपनीत स्फोट होऊन आग लागली. या आगीत कोणीही जखमी झाले नसले तरी पंचक्रोशी पुन्हा एकदा भयभीत आहे.

गेली अनेक वर्षे येथे कार्यरत असलेली एमआर स्पेशालिटी प्रा. लि. ही कंपनी एफबीडी या मटेरियलचे उत्पादन घेते. याच मटेरियलचे मिश्रण करण्याचे काम सुरू असतानाच मटेरियलने पेट घेतला. थोडक्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. ही आग मोठ्या प्रमाणावर वाढत जाऊन संपूर्ण प्लॅन्टमध्ये आगीने प्रवेश केला. चारही बाजूंनी बंद असणाऱ्या या बिल्डींगमधून आगीला बाहेर जाण्यास वाव न मिळाल्याने आग कोंडली गेली. त्यामुळे स्फोट होऊन शेडवरील पत्रे उडाले.

स्फोटाच्या आवाजामुळे असंख्य लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी कंपनी आवाराबाहेर धाव घेतली. यावेळी कंपनीत दोन महिला कर्मचाऱ्यांसह एकूण एकवीस कामगार काम करत होते. ज्या ठिकाणी स्फोट झाला तेथे तीन कामगार उपस्थित होते. मात्र कुणाला काहीही इजा झाली नसल्याचे सांगण्यात आले.

घटना घडताच लोटे औद्योगिक वसाहतीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाने खेड नगरपरिषदेचा अग्निशमन वाहनही दाखल झाले. आग लागताच घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक ग्रामस्थांमधील मनोहर कालेकर, नाना चाळके, आवाशी सरपंच अ‍ॅड. राज आंब्रे, उपसरपंच अमित आंब्रे, सदस्य संदेश शिगवण, आवाशीचे ग्रामस्थ सुदेश आंब्रे, सतीश आंब्रे, अजिंक्य आंब्रे, सुभाष आंब्रे, सखाराम गोरे, लोटेचे सरपंच चंद्रकांत चाळके व अन्य लोटे, घाणेखुंट, तलारीवाडी, पिरलोटे, गुणदे, असगणीचे संदीप फडकले व अन्यजणांनी आग आटोक्यात आणण्यास मदत केली.

.............

मटेरियलच्या साठ्याचा अडथळा

रविवार दि. १८ रोजी येथील समर्थ इंजिनिअरिंग कंपनीत झालेल्या स्फोटानंतर अग्निशमन दल लगेचच दाखल झाले. मात्र कंपनी आवारात सगळीकडेच मटेरियल भरून ठेवलेल्या ड्रममुळे घटनास्थळापर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण येत होता. त्यामुळे कंपनीत अडकलेल्या तिघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. अन्य जखमींनाही बाहेर काढण्यासाठी जिकिरीचे प्रयत्न करावे लागले. तशीच अवस्था एमआर स्पेशालिटी कंपनीतही निदर्शनास आली. कंपनी प्रवेशद्वारापासूनच प्लॅन्टपर्यंत असणाऱ्या रस्त्यावरच एकावर एक रचून ठेवलेले ड्रम अग्निशमन वाहनांसाठी अडथळा ठरले. त्यामुळेच आग आटोक्यात आणण्यासाठी एक तासाहून अधिक काळ झुंज द्यावी लागली. औद्योगिक सुरक्षा निरीक्षकांनी पाहणी करताना या गोष्टींचा प्रामुख्याने विचार करावा, अशी मागणी मदत करणाऱ्यांकडून केली जात आहे.