राजापुरात शिवसेनेचे सहा सरपंच बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 13:45 IST2017-10-04T13:45:30+5:302017-10-04T13:45:34+5:30

राजापूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच बिनविरोध निवडुन आल्याचा दावा शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी केला आहे.तालुक्यातील सर्वच्या सर्व म्हणजेच ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सहा ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी अन्य कोणीही उमेदवारी अर्जच दाखल झालेले नाहीत. त्यामुळे शिवसनेचे तेथील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, असा दावा कुवळेकर यांनी केला आहे.

Six sarpanch unanimity of Shiv Sena in Rajapura | राजापुरात शिवसेनेचे सहा सरपंच बिनविरोध

राजापुरात शिवसेनेचे सहा सरपंच बिनविरोध

राजापूर, दि. ४ : तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच बिनविरोध निवडुन आल्याचा दावा शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी केला आहे.


तालुक्यातील सर्वच्या सर्व म्हणजेच ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सहा ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी अन्य कोणीही उमेदवारी अर्जच दाखल झालेले नाहीत. त्यामुळे शिवसनेचे तेथील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, असा दावा कुवळेकर यांनी केला आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार येळवण येथे शिवसेनेच्या दीपिका दिलीप तावडे, नाटे येथे गावी योगिता रोहिदास बांद, देवीहसोळमधून सुवर्णा शाम भोवड, प्रिंदावणमधून प्रियांका विजय तिर्लोटकर, शेजवलीतून अनामिका अजय मेस्त्री, खडीकोळवणमधून सुभाष राजाराम गुरव यांचा समावेश आहे. या सहा ठिकाणी शिवसेनेव्यतिरिक्त कुणाचाच अर्ज सरपंच पदासाठी सादर झालेला नाही.

Web Title: Six sarpanch unanimity of Shiv Sena in Rajapura