शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

SSC Result2024: कोकण विभागात सिंधुदूर्ग अव्वल, यंदाही मुलींचीच बाजी

By मेहरून नाकाडे | Updated: May 27, 2024 16:02 IST

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात झाली वाढ

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागिय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. २७ मे) जाहीर झाला असून एकूण निकाल ९९.०१ टक्के लागला आहे. दहावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने पुन्हा अव्वल स्थान मिळविले आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात ०.९ टक्के इतकी वाढ झाली आहे.कोकण मंडळापाठोपाठ कोल्हापूर मंडळाचा ९७.४५ टक्के, तर पुणे मंडळाचा ९६.४४ टक्के इतका निकाल लागला आहे. सर्वात कमी निकाल नागपूर मंडळाचा असून ९४.७३ टक्के इतका लागला आहे.रत्नागिरी सिंधुदूर्ग जिल्ह्यातून २६ हजार ७८० विद्यार्थी परीक्षेस बसले होते पैकी २६ हजार ५१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण मंडळातून १३ हजार ७३५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी १३ हजार ५५१ विद्यार्थी पास झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.६६ टक्के लागला आहे. कोकणातून १३ हजार ४५ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या त्यापैकी १२ हजार ९६६ विद्यार्थिनी पास झाल्या आहेत. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ०.७३ टक्के अधिक आहे.

सिंधुदूर्गचा निकाल ९९.३५ टक्केसिंधुदूर्ग जिल्ह्यातून ८ हजार ७८८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी ८ हजार ७३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल ९९.३५ टक्के लागला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातून ४ हजार ५७६ मुलगे परीक्षेला बसले होते त्यापैकी ४ हजार ५३५ मुलगे पास झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.१० टक्के आहे. जिल्ह्यातून चार हजार २१२ मुली परीक्षेस बसल्या होत्या पैकी चार हजार १९६ मुली पास झाल्या असून उत्तीर्णत्तेचे प्रमाण ९९.६२ टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ०.५२ टक्केने अधिक आहे.

रत्नागिरीचा निकाल ९८.८५ टक्केरत्नागिरी जिल्ह्यातून १७ हजार ९९२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी १७ हजार ७८६ विद्यार्थी पास झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.८५ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून ९१५९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी ९०१६ विद्यार्थी पास झाले आहेत. उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.२८ टक्के लागला आहे. ८८३३ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या पैकी ८७७० विद्यार्थिनी पास झाल्या असून उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.२८ टक्के लागला आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १.७५ टक्केने अधिक आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSSC Resultदहावीचा निकालsindhudurgसिंधुदुर्ग